19 November 2024 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Yes Bank Share Price | येस बँक जबरदस्त नफ्यात, तरीही तज्ञ शेअरबाबत नकारात्मक का? शेअर प्राईस इतकी खाली येणार?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price| एक काळ असा होता, जेव्हा येस बँकेचे शेअर्स 400 रुपयेवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 16 रुपयेच्या खाली पोहचला आहे. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते पुढील काळात हा स्टॉक 14 रुपयांच्या खाली जाऊ शकतो. जानेवारी-मार्च 2023 मध्ये येस बँकेने जबरदस्त तिमाही नफा कमावला आहे.

Yes Bank Limited Stock Price Today on NSE & BSE

ICICI सिक्युरिटीज फर्मने आपला येस बँक स्टॉकवर 13.5 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या किंमत 14 टक्के खाली आहे. शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 येस बँकेचे शेअर्स 15.68 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ब्रोकरेज फर्म स्टॉकबाबत नकारात्मक :
येस बँकेचे मार्च 2023 चे तिमाही निकाल फारसे चांगले किंवा फार वाईटही नव्हते. उत्तम व्यवसाय वाढ आणि NIM सह बँकेच्या मालमत्ता गुणवतत्तेत सुधारणा झाली आहे. फ्रँचायझी आणि किरकोळ अभिमुखतेमध्ये गुंतवणूक केल्याने बँकेचा नफा कमी झाला. ब्रोकरेज फर्म मालमत्तेची गुणवत्ता आणि भांडवली पातळीत जलद सुधारणा पाहून प्रभावित आहेत, मात्र सुस्त ऑपरेटिंग कमाईमुळे तज्ञ येस बँक स्टॉक बँक स्टॉकबाबत उत्साही नाही.

ब्रोकरेज फर्मच्या मते आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत येस बँकेच्या कमाईत हळूहळू खूप सुधारणा पाहायला मिळेल. कारण किरकोळ व्यवसायाला सेटअप होण्यासाठी बराच वेळ लागतो. याशिवाय एटी-1 बॉड्सच्या राइट ऑफचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून निकाल विरोधात जाण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत ब्रोकरेज फर्मने येस बँक कंपनीच्या शेअरची रेटिंग होल्ड वरून कमी केली असून शेअरची लक्ष किंमत 13.5 रुपये जाहीर केली आहे.

25 मार्च 2013 रोजी येस बँकेचे शेअर्स 87.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नंतर 20 ऑगस्ट 2018 पर्यंत हा स्टॉक वाढून 394 रुपयांवर पोहोचला होता. या पाच वर्षांत येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 364 टक्के परतावा कमावून दिला होता. तथापि या चढ-उतारानंतर 16 जुलै 2019 रोजी स्टॉक 100 रुपयांवर आला होता. आणि 17 जुलै 2019 रोजी शेअरने 100 रुपये किंमत ओलांडली आणि स्टॉक 108.5 रुपयांवर पोहोचला. मात्र इथून शेअरची किंमत कोसळली आणि पुन्हा कधीही शेअर या किमतीवर गेला नाही.

14 डिसेंबर 2022 रोजी येस बँकेचे शेअर्स 24.75 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. सध्या स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 37 टक्क्यांनी खाली असून 15.68 रुपयेवर ट्रेड करत आहे. मागील वर्षी 20 जून 2022 रोजी येस बँक स्टॉक 12.26 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर पोहचला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price Today on 01 May 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(194)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x