16 April 2025 4:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Gautam Gambhir Vs Virat Kohli | आयपीएलमध्ये गल्ली क्रिकेट वाद! विराट कोहली आणि गौतम गंभीरवर तुफान टीका होतेय

Gautam Gambhir Vs Virat Kohli IPL 2023

Gautam Gambhir Vs Virat Kohli | लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीर, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा फलंदाज विराट कोहली आणि लखनौ संघाचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांनी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची प्रतिष्ठा बिघडवण्याचे काम केल्याची टीका सुरु झाली आहे. अशा तऱ्हेने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आणि आयपीएलच्या आयोजन समितीने या तिघांवर कडक कारवाई केली आहे. बीसीसीआयने गंभीर, विराट आणि नवीन यांना मोठा दंड ठोठावला आहे.

आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी लखनौ टीमचा मेंटॉर गौतम गंभीरला मॅच फीच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आरसीबीचा टॉप फलंदाज विराट कोहलीची मॅच फी ही देखील १०० टक्के कापली जाणार आहे. याशिवाय नवीन उल हकला मॅच फीच्या 50 टक्के दंड भरावा लागणार आहे. सामन्यानंतर काही तासांनी ही कारवाई करण्यात आली आहे. आधी नवीन आणि विराट यांच्यात संघर्ष झाला आणि मग गंभीर आणि विराट यांच्यात तू-तू, मै-मै असा वाद झाला.

सामना सुरू असताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात वाद झाला. त्यावेळी अमित मिश्राने मध्यस्थी करत कोहलीला दूर नेलं. मात्र, कोहली काहीतरी बोलत होता. त्यावेळी पंचांनी कोहलीसोबत चर्चा केली. नवीन उल हक ला सांगावं असं कोहली म्हणत होता. पण, सामना संपल्यानंतर वाद आणखी वाढला.

सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि नवीन उल हक यांनी हस्तांदोलन केलं. दोघांमध्येही संभाषणही झालं. मात्र, त्यानंतरच वाद वाढला. दोघेही एकमेकांना काहीतरी बोलले आणि हात झटकले. त्यानंतर काईल मेयर्स आणि विराट कोहली एकमेकांशी बोलत होते. त्याचवेळी गौतम गंभीर आला आणि त्याने काईल मेयर्स विराट कोहलीपासून दूर नेले. हे झाल्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांना काहीतरी बोलले. त्यानंतर गौतमी गंभीर पुन्हा कोहलीच्या दिशेने बोलत येतो. गंभीरला केएल राहुल आणि मोहसीन खान थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, गंभीर पुढे चालून गेला.

कोहली-गंभीरमध्ये जुने वाद
माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील संबंध आधीपासूनच वादात आहेत. 2013 मध्ये आयपीएलदरम्यान दोघांमध्ये वाद झाला होता. सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान लखनऊने आरसीबीचा पराभव केल्यानंतर गौतम गंभीरने आरसीबीच्या चाहत्यांना तोंडावर बोट ठेवून चूप राहण्याचे हावभाव केले होते. लखनऊला पराभूत केल्यानंतर विराट कोहलीनेही असंच केलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gautam Gambhir Vs Virat Kohli IPL 2023 check details on 02 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या