NCC Share Price | रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा शेअर तेजीत वाढतोय, खरेदी करणार?
NCC Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनसीसी कंपनीचे शेअर्स 2.9 टक्क्यांच्या वाढीसह 123.20 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के वाढीसह 123.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. NCC लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 126.90 रुपये होती.
NCC कंपनीच्या शेअर्समध्ये ही अचानक वाढ एक नवीन कार्यादेश प्राप्त झाल्याने होत आहे. रेखा झुनझुनवाला यांनीही NCC लिमिटेड कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. NCC कंपनीला 3344 कोटी रुपये मूल्याची वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. 2 मे 2023 रोजी कंपनीने सेबीला कळवले होते की, कंपनीला 6 वर्क ऑर्डर मिळाल्या असून त्यांचे मूल्य 3344 कोटी रुपये आहे.
या 6 ऑर्डरपैकी 3 ऑर्डरचे मूल्य 2506 कोटी रुपये आहे. हे तिन्ही काँट्रॅक्ट बांधकामाशी संबंधित आहेत. NCC कंपनीला इलेक्ट्रिक प्रकल्पासाठी 538 कोटी रुपये दोन ऑर्डर आणि 300 कोटी रुपयांच्या पाणी विभागासाठी एक ऑर्डर देण्यात आली आहे.
NCC कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी NCC कंपनीत मोठी गुंतवणुक केली आहे. मार्च 2023 पर्यंत या कंपनीचे 13.09 टक्के भाग भांडवल रेखा झुनझुनवाला यांनी धारण केले आहे. NCC लिमिटेड ही कंपनी मुख्यतः पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करते. NCC लिमिटेड कंपनी रस्ते, व्यावसायिक इमारती, पाणीपुरवठा, खाणकाम, वीज पारेषण इत्यादी विकास संबंधित सेवा देखील प्रदान करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | NCC Share Price Today on 03 May 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल