22 November 2024 10:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Adani Green Energy Share Price | अदानी ग्रुपचा हा शेअर वेगात धावतोय, शेअरची किंमत 100 टक्के वाढली, गुंतवणूक करावी का?

Adani Green Energy Share Price

Adani Green Energy Share Price | ‘अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीने 2023 या आर्थिक वर्षात 974 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत कंपनीने दुप्पट निव्वळ नफा कमावला आहे. या तिमाहीत कंपनीने 489 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स कोसळले होते. मात्र 28 फेब्रुवारी ते 28 एप्रिल या कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.35 टक्के घसरणीसह 942.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी ग्रीन एनर्जी तिमाही निकाल :
जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने 508 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी कंपनीने 121 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीने चौथ्या तिमाहीत 2988 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. ज्यात वार्षिक 88 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीला 125 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे.

27 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 462 20 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 952 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजेच या काळात अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 105 टक्के परतावा कमावून दिला आहे. हिंडेनबर्गचा अहवाल 24 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला होता. तेव्हा अदानी ग्रीन कंपनीचे शेअर्स 1916.80 रुपयेवर ट्रेड करत होते. ही किंमत गाठण्यासाठी कंपनीला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 13.68 टक्के परतावा कमावून दिला आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3000 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 439.10 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Energy Share Price Today on 03 May 2023.

हॅशटॅग्स

#Adani Green Energy Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x