23 November 2024 4:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Varanium Cloud Share Price Today | मालामाल शेअर! 577% परतावा आणि बोनस, स्टॉक स्प्लिट, डिव्हिडंड असं सर्वकाही, खरेदी करणार?

Varanium Cloud Share Price

Varanium Cloud Share Price Today | ‘वेरेनियम क्लाउड’ कंपनीचे शेअर्स मागील वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 577 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे.

Varanium Cloud Limited Stock Price Today on NSE & BSE

त्याचबरोबर कंपनी आपल्या शेअर धारकांना लाभांशही वाटप करणार आहे. या कंपनीचे शेअर्स IPO गुंतवणूकदारांना 122 रुपये किमतीवर जारी करण्यात आले होते. आणि शेअरची किंमत 131 रुपयेवर ओपन झाली होती. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 909.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

बोनस, स्टॉक स्प्लिट आणि डिव्हिडंड :
मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर करून ‘वेरेनियम क्लाउड’ कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 साठी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर 7 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासोबत ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स देखील वाटप करणार आहे. आणि 1 : 2 या प्रमाणात स्टॉक स्प्लिटचा लाभ देणार आहे. यासाठी कंपनीने 9 मे 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे.

IPO ला प्रतिसाद :
‘वेरेनियम क्लाउड’ कंपनीच्या IPO चा आकार 37 कोटी रुपये होता. आणि मागील वर्षी हा IPO 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO साठी कंपनीने 122 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली होती. आणि एका लॉटमध्ये 1000 शेअर्स जारी करण्यात आले होते. हा IPO एकूण 5.46 पट सबस्क्राईब झाला होता. आणि 27 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध करण्यात आले होते.

वरेनियम क्लाउडबद्दल थोडक्यात :
या कंपनीची डिसेंबर 2017 साली करण्यात आली होती. ही कंपनी आपल्या ग्राहकांना आर्थिक ब्लॉकचेनवर आधारित डिजिटल ऑडिओ, व्हिडिओ आणि स्ट्रीमिंग सेवा प्रदान करण्याचे काम करते. मार्च 2023 च्या तिमाहीत या कंपनीने 29.48 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला असून मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला 7.93 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा नफा 8.40 कोटी रुपयेवरून वाढून 85.46 कोटीवर पोहचला आहे. तर 2020-21 मध्ये कंपनीचा नफा 2.89 कोटी रुपयेवर पोहचला आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कंपनीला 1.49 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Varanium Cloud Share Price Today on 04 May 2023.

हॅशटॅग्स

Varanium Cloud Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x