23 November 2024 4:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

अत्यंत महत्वाच्या शिमला महानगरपालिका निवडणुकीत भाजपची सत्ता गेली, मतदारांचा काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा कौल

Shimla Municipal Corporation Election 2023

Shimla Municipal Corporation Election 2023 | शिमला महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने चमकदार कामगिरी केली आहे. काँग्रेसने १० वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. महापालिकेची सत्ता भाजपच्या हातून गेली आहे. ३४ प्रभागांपैकी २४ प्रभागांत काँग्रेसने विजय मिळवला आहे.

यासह काँग्रेसने स्पष्ट बहुमतासह १८ चा जादुई आकडा पार केला आहे. तर भाजपला केवळ नऊ जागांवर विजय मिळवता आला. एक जागा माकपच्या वाट्याला गेली, तर ‘आप’ला खातेही उघडता आले नाही. बहुतांश प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

काय सांगते आकडेवारी
* काँग्रेस – २४
* भाजप – 9
* माकपा – 1

अनेक दिग्गज निवडणुकीत पराभूत
काँग्रेस आणि भाजपचे अनेक दिग्गज निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या निवडणुकीत भाजपचे माजी महापौर सत्या कौंडल यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. संजौली चौक येथून काँग्रेसच्या उमेदवार ममता चंदेल यांनी माजी महापौर आणि भाजपाच्या उमेदवार सत्या कौंडल यांचा पराभव केला. काँग्रेसमधून बंडखोरी करून कृष्णानगर प्रभागातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे माजी महापौर सोहन लाल यांचाही पराभव झाला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shimla Municipal Corporation Election 2023 check details on 04 May 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x