Control Print Share Price Today | या शेअरचे गुंतवणूकदार झाले करोडपती, शेअरने 12860 टक्के परतावा दिला, खरेदी करणार का?
Control Print Share Price Today | ‘कंट्रोल प्रिंट’ या विविध प्रकारचे प्रिंटर बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स कमकुवत बाजारातही तेजीत धावत आहेत. दीर्घकालीन गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार या शेअरमध्ये पैसे लावून करोडपती झाले आहेत. ब्रोकरेज फर्मच्या मते, शेअरमध्ये आणखी तेजी ययेण्याचे संकेत मिळत आहेत. सध्याच्या किंमत पातळीपासून हा स्टॉक 17 टक्के वाढू शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.81 टक्के वाढीसह 580.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
ब्रोकरेज फर्म कंट्रोल प्रिंट कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. कंट्रोल प्रिंट कंपनीने मागील एका आर्थिक वर्षात 15.4 टक्क्यांच्या वाढीसह 88.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर मार्च 2023 तिमाहीत 29.7 टक्के वाढीसह 16 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या मते मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी कंपनीच्या व्यापारात मजबूत वाढीचा वाव आहे.
ही कंपनी उच्च मार्जिन व्यवसाय क्षेत्रात व्यापार करत आहे. याशिवाय कंपनी बाजारातील जास्तीत जास्त हिस्सा काबीज करण्याचा प्रयत्न करणार आहे. कंपनी नवनवीन उत्पादने लाँच करत असून त्यांना बाजारातून चांगली मागणी मिळत आहे. त्यामुळे ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअरला बाय रेटिंग देऊन स्टॉक 690 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
गुंतवणूकदार झाले करोडपती :
23 मार्च 2001 रोजी कंट्रोल प्रिंट कंपनीचे शेअर्स 4.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 12860 टक्क्यांनी वाढून 592.25 रुपये किमतीवर पोहचला आहे. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 78000 रुपये गुंतवणुकीवर 22 वर्षांत करोडो रुपये परतावा कमावून दिला आहे.
कंट्रोल प्रिंट कंपनीचे शेअर्स 28 डिसेंबर 2022 रोजी 376 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. अवघ्या पाच महिन्यात म्हणजेच 5 मे 2023 रोजी पर्यंत हा स्टॉक 59 टक्क्यांच्या वाढीसह 596.75 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपासून 17 टक्क्यांनी वाढू शकतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Control Print Share Price Today on 06 May 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल