27 April 2025 2:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | पीएसयू शेअरने दिला 353 टक्के परतावा, आता फायद्याची अपडेट आली, टार्गेट जाणून घ्या - NSE: SJVN Mazagon Dock Share Price | बिनधास्त खरेदी करावा हा मल्टिबॅगर शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MAZDOCK Reliance Share Price | भरवशाचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RELIANCE Vikas Lifecare Share Price | 2 रुपये 55 पैशाचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या
x

काल म्हणाले, पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष कोण? दुसरीकडे मनसेत राजकीय भवितव्य नाही हे समजल्याने मनसे नेत्यांचे दुसऱ्या पक्षात प्रवेश

Raj Thackeray

MNS Chief Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धाराशिवमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. प्रशांत नवगिरे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीमध्ये भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे धाराशिवमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठी पोकळी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. नवगिरे यांनी काही काळ महाराष्ट्र नवनिर्माण एसटी कामगार सेनेच्या उपाध्यक्षपदाची देखील जबाबदारी सांभाळली होती.

एकाबाजूला राज ठाकरे सभांमधून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना गर्जना करत आपलीच सत्ता येणार असं सांगत असले तर जमिनीवरील वास्तव राज्यातील स्थानिक नेते अचूक जाणतात. मनसे जमिनीवर पक्ष संघटन म्हणून अत्यंत कमजोर आहे हे वास्तव आहे. त्यामुळे ग्राम पंचायत ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये मनसेचं अस्तित्व दिसत नाही. अगदी विविध राजकीय सर्व्हे आले तरी त्यातही मनसेचा साधा उल्लेखही नसतो. निवडणुकीतही उमेदवारांना कोणतीही आर्थिक रसद पुरवली जातं नाही, मात्र पक्षांतर्गत कुरघोड्या मात्र जोरात सुरु असतात.

अनेक नेते काम करूनही मनसेत साधे नगरसेवक म्हणून देखील आत्मविश्वासाने निवडणूक येताना दिसत नाहीत. मात्र तेच नेते जेव्हा जेव्हा मनसे सोडून इतर पक्षातून उमेदवार होतात, तेव्हा मात्र ते थेट नगरसेवक, आमदार आणि खासदार होतात याची अनेक उदाहरणं समोर आहेत. त्यामुळे मनसे बद्दल आणि पक्ष चिन्हाबद्दल लोकांमध्ये कोणतीही उत्सुकता नसते आणि त्याचे मूळ कारण म्हणजे जमिनीवर पक्ष संघटन अत्यंत कमकुवत आहे. त्यामुळे रसद पुरवली जाईल अशा पक्षाच्या शोधात अनेक मनसे नेते आहेत. त्याचीच सुरुवात आता निवडणुकांपूर्वी झाली आहे.

भारत राष्ट्र समिती रसद पुरविण्याचे आश्वासन देतेय?
भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखरराव हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं नशीब अजमावून पहात आहेत. के. चंद्रशेखरराव यांनी महाराष्ट्रात विशेष: मराठवाड्यात सभांचा धडाका लावला आहे. अनेक नेत्यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश देखील केला आहे. आता भारत राष्ट्र समितीने धाराशिवमध्ये मनसेला खिंडार पाडलं आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे भारत राष्ट्र समिती आगामी निवडणुकीत उमेदवारांना राजकीय रसद पुरवेल अशी ग्वाही देत असल्याचं वृत्त आहे.

पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष कोण
पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले, असा टोला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता राज यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला मी विरोध करत असल्याचे शरद पवार यांनी पसरवले. मात्र या पवार यांनी आजपर्यंत एकदाही आपल्या भाषणात शिवछत्रपतींचे नाव घेतलेले नाही. आपला विरोध शिवछत्रपतींच्या स्मारकाला असूच शकत नाही, असेही राज म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MNS leader from Dharashiv joins BRS Party check details on 07 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(55)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या