23 November 2024 8:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

NoMoPhobia Effects | तुम्हालाही 'नोमोफोबिया' झालाय का? स्मार्टफोनबाबत तुम्हीही याच विचारात असता का? धक्कादायक सर्वेक्षण रिपोर्ट

NoMoPhobia Effects

NoMoPhobia Effects | स्मार्टफोन आज लोकांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. लोकांना स्मार्टफोनशिवाय जगणे कठीण झाले आहे. आज लोक कुठल्याही किंमतीत आपल्यापासून स्मार्टफोन दूर करू इच्छित नाहीत. आता नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातही हे सिद्ध झाले आहे. नुकतेच ओप्पो आणि काउंटरपॉइंटने स्मार्टफोनच्या व्यसनाबाबत एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाला ‘नोमोफोबिया’ असे नाव देण्यात आले होते.

स्मार्टफोनपासून दूर राहण्याची भीती
सर्वेक्षणानुसार, 65 टक्के वापरकर्ते आपल्या स्मार्टफोनशी भावनिकरित्या जोडलेले आहेत. इंटरनेट संपणार नाही, फोन हरवणार नाही आणि बॅटरी संपणार नाही, अशी चिंता त्यांच्या मनात नैसर्गिकरीत्याच निर्माण होऊ लागली आहे. नोमोफोबिया हा ‘नो मोबाइल फोबिया’चा शॉर्टफॉर्म आहे. ही एक प्रकारची भीती आहे, ज्यामध्ये लोकं मोबाईलशिवाय राहू शकत नसल्याचे संकेत स्पष्ट करत आहे.

60 टक्के युजर्सना फोनच्या खराब बॅटरीमुळे चिंता असते
ओप्पो आणि काउंटरपॉइंटच्या या सर्वेक्षणात 1,500 लोकांनी प्रतिसाद दिला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सुमारे ६० टक्के लोकांनी कबूल केले की, खराब बॅटरीमुळे ते स्मार्टफोन बदलण्यास तयार आहेत. ओप्पो इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर दमयंत सिंग खनोरिया म्हणाले, ‘या सर्वेक्षणामुळे आम्हाला चांगली बॅटरी लाइफ असलेले फोन लाँच करण्याची प्रेरणा मिळाली आहे. मात्र बॅटरीमुळे आपण मोबाईलपासून दूर राहू याची देखील युजर्सना चिंता असल्याचं अधोरेखित होतंय.

महिलांपेक्षा पुरुषांना मोबाइल फोनची जास्त काळजी
महिलांपेक्षा पुरुषांना मोबाइलची जास्त काळजी असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ८२ टक्के पुरुषांनी फोनबाबत अधिक तणाव असल्याचे सांगितले, तर ७४ टक्के पुरुषांनी फोनच्या बॅटरी आणि इंटरनेटबद्दल चिंता व्यक्त केली. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ९२.५ टक्के लोकांनी पॉवर सेव्हिंग मोड वापरत असल्याचे सांगितले, तर ८७ टक्के लोकांनी फोन पूर्ण चार्ज झाल्यावरच फोन वापरत असल्याचे सांगितले. त्यातूनही फोन सतत आपल्या जवळ असावा असं लोकांना वाटू लागलं आहे. त्यात पुरुषांचं प्रमाण अधिक आहे.

४२ टक्के युजर्स मनोरंजनासाठी फोनचा वापर करतात
४२ टक्के लोकांनी सांगितले की, ते मनोरंजनासाठी फोनचा वापर करतात आणि मनोरंजनासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. सुमारे ६५ टक्के लोकांनी सांगितले की, बॅटरी वाचवण्यासाठी त्यांना अनेकवेळा फोन वापरणे थांबवावे लागते. पण मनोरंजनासाठी त्यांना सतत फोन जवळ असावा असं वाटू लागलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: NoMoPhobia Effects on users in daily life check details on 08 May 2023.

हॅशटॅग्स

#NoMoPhobia Effects(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x