16 April 2025 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA
x

Madhya Pradesh BJP | मध्य प्रदेश भाजपात निवडणुकीपूर्वी मोठं राजकीय बंड होणार, काँग्रेसच्या संपर्कात बडे नेते, मुख्यमंत्री दिल्लीला

Madhya Pradesh BJP

Madhya Pradesh BJP | भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सरकार चिंतेत असल्याचे दिसत आहे. अनेक बड्या नेत्यांच्या बंडखोरीदरम्यान मुख्यमंत्री चौहान रविवारी अचानक दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. माजी मुख्यमंत्री कैलास जोशी यांचे चिरंजीव दीपक जोशी यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुख्यमंत्री चौहान यांच्या दिल्ली दौऱ्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एका मीडिया रिपोर्टनुसार, काँग्रेसचे प्रदेश मीडिया प्रभारी के. के. मिश्रा दावा करत आहेत की, मुख्यमंत्री चौहान यांच्या नैतृत्वावर भाजपचे बडे स्थानिक नेते नाखूष असून सत्ता जाण्याच्या भीतीने ते काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती भाजप हायकमांडला देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात भाजपमध्ये असंतोष व्यक्त वाढला आहे. भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेले जोशी सातत्याने मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत आहेत. कोविड-19 मुळे पत्नीचा मृत्यू झाल्याबद्दलही त्यांनी चौहान यांच्यावर टीका केली होती.

भाजपचे दिग्गजही चिंतेत
भाजपचे ज्येष्ठ नेते रघुनंदन शर्मा आणि राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय हे देखील या परिस्थितीबाबत चिंतेत आहेत. भाजपला पराभूत करण्याची ताकद काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे आणि तशीच राजकीय परिस्थिती राज्यात आहे. भाजपचे नेतेच भाजपला पराभूत करतील. पक्ष संघटनेने केलेल्या चुका वेळीच दुरुस्त न केल्यास भाजप नेतेच भाजपचा पराभव करतील असं त्यांनी म्हटलं.

पक्ष संघटनेसाठी दिल्लीतून पाच प्रभारींना आणण्यात आल्याचे मी ऐकले आहे, पण त्यांनाही स्थानिक नेते जुमानत नाहीत. ज्याचा परिणाम पक्षाला आगामी निवडणुकीत भोगावा लागू शकतो. पाच प्रभारींच्या उपस्थितीत पक्षांतर्गत दुरवस्था अधिक वाढताना दिसतेय असं देखील कैलास विजयवर्गीय यांनी सांगितलं.

हे नेतेही नाराज
एकीकडे जोशी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. तर माजी आमदार सत्यनारायण सत्तान, दोन वेळा आमदारकी भूषविणारे भंवर सिंह शेखावत, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा भाचा अनूप मिश्रा, जैन समाज के सुप्रसिद्ध नेते मुकेश जैन धना वारंवार भाजप सरकारविरोधात बोलत आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या निष्ठावंतांचे वाढते वर्चस्व हे यामागचे एक कारण असल्याचे मानले जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Madhya Pradesh BJP Political Crisis check details on 08 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Madhya Pradesh BJP(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या