23 November 2024 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

MRF Share Price | 1 लाख रुपये किंमत स्पर्श करणारा MRF भारतातील पहिला स्टॉक ठरणार? शेअरची कामगिरी आणि परतावा जाणून घ्या

MRF Share Price

MRF Share Price | ‘एमआरएफ लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स भारतीय शेअर बाजारात सर्वात महाग शेअर मानले जातात. मात्र तरीही या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीचा एक शेअर खरेदी करण्यासाठी तुम्हाला जवळपास एक लाख रुपये खर्च करावे लागतील. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी एमआरएफ कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के घसरणीसह 97,750.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

गुंतवणुकीवर परतावा :
मागील पाच दिवसांत एमआरएफ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 9.51 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर गमतीची गोष्ट अशी की, एमआरएफ कंपनीचे शेअर्स 1 लाख रुपये किंमत स्पर्श करणारा भारतातील पहिला स्टॉक असणार आहे. 5 मे 2023 रोजी एमआरएफ कंपनीचे शेअर्स 3.68 टक्क्यांच्या वाढीसह 98614.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2000 साली एमआरएफ कंपनीचे शेअर्स 1000 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2023 मध्ये हा स्टॉक 1 लाखाच्या जवळ पोहोचला आहे. मागील 23 वर्षात या कंपनीचे शेअर्स 10000 टक्के वाढले आहेत.

कंपनी बद्दल थोडक्यात :
एमआरएफ कंपनीचे सविस्तर नाव, ‘मद्रास रबर फॅक्टरी’ असे आहे. कंपनीचे मुख्यालय चेन्नई येथे स्थित असून कंपनीची सुरुवात 1946 साली झाली होती. 1952 मध्ये कंपनीने वाहन टायर उत्पादन करण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या 4 वर्षांतच कंपनीने 52 टक्के बाजार काबीज केला. MRF कंपनी 1961 साली शेअर बाजारात सूचीबद्ध झाली होती.

1983 साली मारुती 800 गाडी MRF टायर्ससह लॉन्च करण्यात आली. या कंपनीने 2000 साली सचिन तेंडुलकरला ब्रँड ॲ्बेसेडर बनवले. अमेरिकेला टायर निर्यात करणारी MRF ही भारतातील पहिली कंपनी होती. 1989 पासून एमआरएफ.कंपनीने खेळणी बनवण्याच्या व्यवसाय ही सुरू केला आहे. MRF कंपनीने FUNSKOOL या ब्रँड नावाने खेळणी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

अरिहंत कॅपिटल फर्मचे तज्ञ सांगतात की, एमआरएफ कंपनीच्या स्टॉकने आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. हा स्टॉक पुढील काळात 1 लाख रुपये किंमत पार करू शकतो. मागील तिमाहीत या कंपनीने 340 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जो डिसेंबर 2022 च्या तिमाहीपेक्षा दुप्पट आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात एमआरएफ कंपनीने 770 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीची ही कामगिरी अशीच सुरू राहिली तर हा स्टॉक लवकरच 1 लाख रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MRF Share Price today on 08 May 2023.

हॅशटॅग्स

MRF share price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x