15 November 2024 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

Multibagger Stock | मॅरिको कंपनीचा 12998% मल्टिबॅगर परतावा शेअर तेजीत धावतोय, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर, तपशील वाचा

Multibagger Stock

Multibagger Stock | ‘मॅरिको’ या एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या शेअर्सने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. उत्कृष्ट निकालांमुळे कंपनीच्या शेअरमध्ये धमाकेदार उसळी पहायला मिळाली आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 7.67 टक्के मजबूत झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.00 टक्के वाढीसह 536.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

दीर्घकाळात या कंपनीच्या शेअरने 77,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लाखो रुपये परतावा कमावून दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 24 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. मॅरिको कंपनीचे एकूण बाजार भांडवल 68,591.66 कोटी रुपये आहे.

4 रुपये वरून 530 रुपयेवर :
16 मे 2003 रोजी मॅरिको कंपनीचे शेअर्स 4.05 रुपयांवर ट्रेड कर होते. आता हा स्टॉक 536 रुपये किमतीवर पोहचला आहे. हा काळात शेअरची किंमत 12998 टक्क्यांनी वाढली आहे. मॅरिको कंपनीने मागील 20 वर्षात 77,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणूकदारांना करोडोचा नफा मिळवून दिला आहे. मागील वर्षी 23 सप्टेंबर 2022 रोजी हा स्टॉक 554.05 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. 20 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 462.95 रुपये या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर आला होता.

मॅरिको कंपनीची कामगिरी :
मार्च तिमाही मॅरिको कंपनीच्या व्यवसायासाठी उत्तम राहिली होती. या काळात कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 18.6 टक्क्यांच्या वाढीसह 305 कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या प्रमुख ब्रँड पॅराशूटच्या विक्रीत एक टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. ऑपरेटिंग स्तरावर कंपनीचे मार्जिन 16 टक्क्यांवरून वाढून 17.5 टक्क्यांवर पोहोचले आहे. कंपनीच्या देशांतर्गत व्यवसायाचे प्रमाण देखील 5 टक्क्यांनी वाढले आहे. ही कंपनी Saffola, Parachute, Revive, Set Wet, Beardo, Nihar यासारखे ब्रँड बनवण्याचे काम करते.

ब्रोकरेज फर्म जेफरीजने जबरदस्त तिमाही निकाल विचारात घेऊन कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत 550 रुपये वरून वाढून 660 रुपये जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते कंपनीचा मार्जिन दृष्टीकोन, उत्तम खर्च कार्यक्षमता, आणि उच्च वाढीच्या पोर्टफोलिओमुळे मजबूत आहे. जेपी मॉर्गनने या स्टॉकवर 585 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

जेपी मॉर्गन महसूल संकलनातील सुधार आणि मजबूत मार्जिन आउटलुकच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक आहे. मोतीलाल ओसवाल यांनी स्टॉकवर 590 रुपये लक्ष किमतीसह स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock of Marico Share Price Today on 09 May 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x