24 November 2024 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज कंपनीचा सुपर परतावा, 10000 वर दिला कारोडोचा परतावा, शेअरची किंमत चेक करा

Apar Industries Share Price

Apar Industries Share Price | ‘अपार इंडस्ट्रीज’ या अॅल्युमिनियम आणि मिश्र धातु कंडक्टरच्या जगातील सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने मार्च 2023 तिमाहीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. सोमवार दिनांक 8 मे रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. दीर्घ काळात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे.

या कंपनीच्या स्टॉकने अवघ्या 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. मागील एका वर्षात अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने लोकांना 348.23 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.72 टक्के वाढीसह 2,647.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

अपार इंडस्ट्रीजची मार्च तिमाहीतील कामगिरी :
मार्च 2023 तिमाहीच्या उत्कृष्ट निकालांच्या पार्श्वभूमीवर अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. मार्च 2023 तिमाहीत अपार इंडस्ट्रीज कंपनीची विक्री वार्षिक 35.4 टक्क्यांच्या वाढीसह 4,056.53 कोटीवर पोहचली आहे. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 194 टक्क्यांच्या वाढीसह 242.73 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

अपार इंडस्ट्रीज कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षात 10 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या पूर्ण पेड शेअर्सवर 40 रुपये म्हणजेच 400 टक्के लाभांशही वाटप केले होते. कंपनी मुख्यतः कंडक्टर, विविध प्रकारच्या केबल्स, विशेष तेल, पॉलिमर आणि वंगण बनवण्याचे काम करते.

10 हजार वर करोडोचा परतावा :
30 मार्च 2001 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 104077 टक्क्यांनी वाढून 2,647.00 रुपये किमतीवर पोहचला आहे. अवघ्या 22 वर्षांत 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर या स्टॉकने लोकांना 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. 11 मे 2022 रोजी हा स्टॉक 558.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. अवघ्या एका वर्षात स्टॉकने 490 टक्क्यांची उसळी घेतली आणि 3296.40 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apar Industries Share Price today on 10 May 2023.

हॅशटॅग्स

Apar Industries share price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x