22 November 2024 1:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Canara Bank Share Price | कॅनरा बँक या सरकारी बँकेच्या FD वर किती व्याज देईल? पण याच बँकेचा शेअर 30% परतावा देईल

Canara Bank Share Price

Canara Bank Share Price | ‘कॅनरा बँक’ या सरकारी बँकेचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध आहेत. बँकेने तिमाही काळात चांगली कामगिरी केली आहे. अशा स्थितीत या शेअरमध्ये तेजीचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅनरा बँकेचे शेअर 302.85 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. तर आज हा स्टॉक 1.06 टक्के घसरणीसह 299.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. कॅनरा बँकेच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 341.70 रुपये होती. 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 171.75 रुपये होती.

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने नुकताच कॅनरा बँकवर एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात तज्ञांनी कॅनरा बँकेच्या शेअरवर 400 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत हा स्टॉक पुढील काळात 30 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो.

सध्याच्या किमतीवर जर तुम्ही 1 लाख रुपये लावले तर तुम्हाला 1 वर्षाच्या आत 1.30 लाख रुपये परतावा मिळू शकतो. जेएम फायनान्शिअल फर्मने कॅनरा बँकेच्या स्टॉकवर 371 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 21 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

मार्च 2023 तिमाहीत कॅनरा बँकेच्या नफ्यात जवळपास दुप्पट वाढ झाली असून बँकेने 3,175 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. एक वर्षभरापूर्वी जानेवारी ते मार्च या तिमाहीत कॅनरा बँकेने 1,666 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मजबूत कर्ज वाढ आणि मालमत्तेची गुणवत्ता सुधारल्याने कॅनरा बँकेच्या कमाईत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. याशिवाय बँकेच्या कॉर्पोरेट कर्जातही 21 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Canara Bank Share Price Today on 10 May 2023.

हॅशटॅग्स

#Canara Bank Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x