23 November 2024 1:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Varun Beverages Share Price | वरुण बेव्हरेजेसच्या शेअरने 1 वर्षात 121 टक्के परतावा दिला, शेअरची कामगिरी चेक करा

Varun Beverages Share Price

Varun Beverages Share Price | ‘वरुण बेव्हरेजेस’ या भारतीय शीतपेय उद्योगातील दिग्गज कंपनीने एक नवीन मैलाचा दगड पार केला आहे. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीने नुकताच 1 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा पार केला आहे. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 1589.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचे बाजार भांडवल 102984 कोटी रुपयांवर पोहचले आहेत. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनी पेप्सिकोची सर्वात मोठी फ्रँचायझी कंपनी आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के घसरणीसह 1,580.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनी ट्रिलियन क्लबमध्ये सामील :
वरुण बेव्हरेजेस कंपनीने आता ट्रिलियन मार्केट कॅप असलेल्या क्लबमध्ये एंट्री केली आहे. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनी एकूण मार्केट कॅपच्या रँकिंगमध्ये 48 व्या क्रमांकावर पोहचली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीच्या शेअर्सने 1595.20 रुपये किंमत स्पर्श केली होती.

वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1654 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 687.68 रुपये होती. वरुण बेव्हरेजेस कंपनी भारतासह 6 इतर देशांमध्ये कार्बोनेटेड पेये, ज्यूस, पॅकेज्ड पेयजल उत्पादन आणि वितरण करण्याचे काम करते.

एका वर्षात 121 टक्के वाढ :
वरूण बेव्हरेजेस कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका वर्षभरात 125.84 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 10 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 721.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. वरुण बेव्हरेजेस कंपनीचे शेअर्स 10 में 2023 रोजी 1589.40 रुपये किमतीवर पोहचले होते. त्याच वेळी मागील 6 महिन्यांत वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या शेअरने 42.81 टक्के परतावा दिला आहे. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचे शेअर्स 14 नोव्हेंबर 2022 रोजी 1084.30 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते, जे आज 1,580.00 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Varun Beverages Share Price today on 11 May 2023.

हॅशटॅग्स

#Varun Beverages Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x