11 March 2025 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 67 रुपये टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर आयआरबी इन्फ्रा शेअर्स साठी BUY रेटिंग - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर घसरतोय, पण तज्ज्ञांना विश्वास, काय आहे पुढची टार्गेट प्राईस पहा - NSE: RPOWER GTL Infra Share Price | 52 आठवड्यांच्या जवळ आली पेनी स्टॉक प्राईस, ही आकडेवारी अपडेट नोट करा - NSE: GTLINFRA NTPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, होईल मजबूत कमाई - NSE: NTPC Reliance Share Price | मॅक्वेरी ब्रोकरेजने दिला खरेदीचा सल्ला, स्वस्तात खरेदीची संधी, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RELIANCE Horoscope Today | 11 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस, तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 11 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Dr Reddys Lab Share Price | डॉ रेड्डीज लॅबोरेटरीजच्या शेअरवर 800 टक्के लाभांश मिळणार, शेअर खरेदीसाठी लगबग वाढली

Dr Reddys Lab Share Price

Dr Reddys Lab Share Price | ‘डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज’ या फार्मा कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत ‘डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज’ कंपनीच्या नफ्यात 11 पट वाढ पाहायला मिळाली आहे. जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत ‘डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज’ कंपनीने 959.20 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीत डॉ रेड्डीज लॅब कंपनीने 87.50 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

मार्च 2023 च्या तिमाहीत डॉ रेड्डीं कंपनीने महसूल 16 टक्के वाढीसह 6296.80 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ‘डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज’ फार्मा कंपनीने 5436.80 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी ‘डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज’ कंपनीचे शेअर्स 6.62 टक्के घसरणीसह 4,545.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

800 टक्के लाभांशची घोषणा :
डॉ . रेड्डीज लॅबोरेटरीज कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रति शेअर 800 टक्के अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ‘डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज’ कंपनी 40 रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश वाटप करणार आहे. या फार्मा कंपनीने 7 सप्टेंबर 2000 पासून आतापर्यंत आपल्या शेअर धारकांना 24 लाभांश वाटप केले आहेत. यापूर्वी मागील 12 महिन्यांत ,डॉ रेड्डीज लॅब कंपनीने प्रति शेअर 30 रुपये लाभांश वाटप केला होता. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज’ कंपनीचे शेअर्स 4,868 रुपयांवर क्लोज झाले होते.

‘डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज’ कंपनीने जागतिक जेनेरिक व्यवसायातून 5430 कोटी रुपये कमाई केली आहे. कंपनीचे सह-अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी.व्ही.प्रसाद यांनी माहिती दिली की, विक्रमी विक्री, नफा आणि रोख प्रवाहाच्या दृष्टीने आर्थिक वर्ष 2023 कंपनीसाठी खूप फायदेशीर ठरले आहे. यूएस जेनेरिक मार्केटमधील मजबूत कामगिरीमुळे कंपनीला जास्त फायदा झाला आहे.

कंपनीने जास्त उत्पादकता आणि शाश्वतता अजेंडा राबवला होता. कंपनीच्या जागतिक जेनेरिक व्यवसायातून वर्षभरात 18 टक्के वाढीसह 5,430 कोटी रुपये महसूल संकलित झाला आहे. डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज कंपनीने उत्तर अमेरिका, युरोप आणि भारतातील बाजारपेठांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Dr Reddys Lab Share Price today on 11 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Dr Reddys Lab Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x