29 April 2025 2:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

Stock To Buy | 25% कमाई करायची आहे? हा शेअर खरेदी करा, शेअरची टार्गेट प्राईस तपासून घ्या

Stock To Buy

Stock To Buy | सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत. आणि गुंतवणुकदार संधीचा फायदा घेऊन मजबूत कमाई करत आहेत. तिमाही निकालाच्या आधारे ब्रोकरेज फर्म आणि स्टॉक मार्केट एक्सपर्ट गुंतवणूकदारांना स्टॉक खरेदी विक्री करण्याचा सल्ला देतात.

मजबूत फंडामेंटल्स असलेल्या स्टॉकमध्ये पैसे लावल्यास गुंतवणूकदार अप्रतिम परतावा कमवू शकतात. असाच एक स्टॉक आहे जो शेअर मार्केट मधील तज्ञांनी गुंतवणुकीसाठी निवडला आहे. या स्टॉकचे नाव आहे, ‘GCPL’ म्हणजेच ‘गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड’ कंपनीचा.

स्टॉक एक्सचेंज फाइलिंगनुसार, ‘गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड’ कंपनीने जानेवारी ते मार्च 2023 या तिमाही काळात 425 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तिमाही कामगिरीच्या आधारे ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी कण्याचा सल्ला दिला आहे.

पुढील काळात हा स्टॉक 25 टक्के वाढू शकतो असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. एफएमसीजी क्षेत्रात ‘गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड’ ही कंपनी आघाडीच्या कंपन्यांमध्ये सामील आहे. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के वाढीसह 999.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

‘गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड’ स्टॉकवर विविध ब्रोकरेज फर्मचे मत :

GCPL वर Goldman Sachs
रेटिंग – खरेदी करा
लक्ष्य किंमत – 1150 रुपये

GCPL वर नोमुरा
रेटिंग – खरेदी करा
लक्ष्य किंमत – 1100 रुपये

GCPL वर मॉर्गन स्टॅनली
रेटिंग – खरेदी करा
लक्ष्य किंमत – 1129 रुपये

GCPL वर जेफरीज
रेटिंग – खरेदी करा
लक्ष्य किंमत – 1200 रुपये

GCPL वर मॅक्वेरी
रेटिंग – होल्ड करा
लक्ष किंमत – 1000 रुपये

मार्च तिमाहीची आर्थिक कामगिरी :
जानेवारी ते मार्च 2023 या तिमाही कालावधीत ‘गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स’ कंपनीची कामगिरी खूप चांगली होती. या कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर 25 टक्के वाढ नोंदवली गेली असून कंपनीचा नफा 363 कोटींवरून वाढून 452 कोटींवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या उत्पन्नात 10 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 3200 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्जिन 16 टक्क्यांवरून वाढून 20.1 टक्क्यांवर पोहोचले आहे, तर ऑपरेटिंग नफ्यात 37 टक्क्यांची जबरदस्त वाढ नोंदवली गेली आहे.

GCPL बद्दल थोडक्यात :
मार्च 2023 तिमाहीत ‘गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड’ कंपनीचा वॉल्युम ग्रोथ अनुमान 5 टक्के होता, मात्र 6 टक्के अनुमान साध्य करण्यात आला. देशांतर्गत बाजारात कंपनीच्या विक्रीमध्ये 12 टक्के वाढ झाली असून वॉल्युम ग्रोथ अनुमान 11 टक्के नोंदवला गेला आहे. इंडोनेशिया बाजारपेठेतील कंपनीच्या मालाची विक्री 8 टक्क्यांनी वाढली आहे. तर आफ्रिका, अमेरिका आणि मध्यपूर्वेतील विक्री देखील 6 टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती कंपनीने तिमाही निकालात दिली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GCPL Stock To Buy Recommended by share market expert on 12 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या