22 November 2024 9:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Auro Impex & Chemicals IPO | ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी ओपन झाला, शेअरची किंमत 74 रुपये

Auro Impex & Chemicals IPO

Auro Impex & Chemicals IPO | IPO मध्ये गुंतवणूक करून फायदा कमावणाऱ्या लोकांसाठी खुशखबर आली आहे. ‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचा IPO 15 मे 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. ‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीच्या IPO बाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड मोठा उत्साह दिसून येत आहे.

12 मे 2023 रोजी सकाळी 11.45 वाजेपर्यंत ‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचा IPO 6 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. ‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 74 ते 78 रुपये निश्चित केली आहे.

चित्तोडगड फर्मच्या अहवालानुसार ‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचा IPO ओपनिंगच्या पहिल्या दिवशी म्हणजे 11 मे 2023 रोजी 2.50 पट सबस्काइब झाला होता. तर दुसऱ्या दिवशी IPO 3.74 पट सबस्क्राईब झाला होता. म्हणजेच हा IPO आतापर्यंत एकूण 6 पट सबस्क्राइब झाला आहे. ज्या लोकांना mankind फार्मा कंपनीचा IPO स्टॉक मिळाला नाही, त्यांच्यासाठी ‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचा IPO गुंतवणूकीची जबरदस्त संधी घेऊन आला आहे.

‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचा IPO 11 मे 2023 रोजी ते 15 मे 2023 पर्यंत गुंतवणूकीसाठी खुला राहणार आहे. या IPO मध्ये प्रति शेअर 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरची प्राइस बँड 74 ते 78 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. तर एक लॉटमध्ये 1600 शेअर्स जारी करण्यात आले आहे. एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना 1,24,800 रुपये जमा करावे लागतील. 18 2023 मे रोजी ‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचे शेअस गुंतवणूकदारांना वाटप केले जातील. आणि स्टॉक लिस्टिंग 23 मे रोजी पूर्ण होईल.

11 मे 2023 रोजी ‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 20 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. हा कल जर असाच सुरू राहिला तर ऑरो इम्पेक्स आणि केमिकल्स कंपनीच्या गुंतवणुकदारांना पहिल्या दिवशी 25.64 टक्के परतावा मिळू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Auro Impex & Chemicals IPO today on 13 may 2023.

हॅशटॅग्स

Auro Impex & Chemicals IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x