13 December 2024 12:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Karnatak Election Effect | कर्नाटकचे परिणाम राजस्थामध्ये, नरेंद्र मोदी ब्रँड प्रचारात वापरल्यास स्थानिक भाजपला मोठ्या पराभवाची भीती?

Karnatak Election Effect

Karnatak Election Effect | कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर आता राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दक्षिणेकडील राज्यात काँग्रेसला मिळालेला दणदणीत विजय आणि मोदींच्या नैत्रुत्वात भारतीय जनता पक्षाच्या दारुण पराभवानंतर आता दोन्ही पक्ष राजस्थानसह तीनही राज्यांमध्ये आपापली रणनीती आखण्यात व्यस्त आहेत.

कर्नाटकच्या निकालाचा परिणाम राजस्थानमधील भाजपच्या योजनांवरही होईल, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत असला तरी सत्ताविरोधी लाट बनविण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रँड प्रचारात वापरल्यास भाजपच्याच पराभवाचे संकेत मिळू लागल्याने भाजपला आपल्या रणनीतीचा फेरविचार करावा लागू शकतो असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. स्वतः आरएसएस सुद्धा आता मोदींच्या बाबतीत नकारात्मक असल्याचं वृत्त आहे.

कर्नाटकातील मोठ्या पराभवानंतर भाजपला जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या टीमवर अवलंबून राहण्याची रणनीती आखावी लागू शकते. काँग्रेसमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि त्यांचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मतभेदांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपलाही ‘कॅप्टनशिप’बाबत स्पष्टता नसल्याने भाजपचा गुंता वाढला आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह अनेक नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.

दुसरकडे, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या जागी शेखावत किंवा अन्य कोणत्याही नेत्याला संधी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे आणि परिणामी स्थानिक भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सभांचा सपाटा लावत आहेत. कर्नाटकातील निवडणूक निकालानंतर भाजप पक्षाचे काही स्थानिक नेते दबक्या स्वरात सांगत आहेत की, ज्याप्रमाणे बीएस येडियुरप्पा यांच्या जाण्याने पक्ष कमकुवत झाला आहे, तसाच राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंसारख्या नेत्याला बाजूला ठेवणे अवघड आहे. २०१३ मध्ये वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कॉंग्रेसचा दारुण पराभव केला होता. त्यावेळी पक्षाने २०० पैकी १६३ जागा जिंकल्या होत्या. मात्र 2018 मध्ये काँग्रेसने मोदी लाट असतानाही दणदणीत विजय प्राप्त केला होता.

2018 मध्ये राजस्थानमध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता, पण तेव्हापासून हा भाजप पक्ष येथे अंतर्गत वादात अडकला आहे. निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांच्या इच्छेला डावलून अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री करण्यात आले. तेव्हापासून पायलट मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी प्रयत्न शील होते. गेहलोत यांनी 2020 मध्ये बंडखोरी करणाऱ्या पायलट यांना गद्दार म्हटले आहे. तर पायलट आपल्याच सरकारविरोधात उपोषण केल्यानंतर यात्रा काढत आहेत. वसुंधरा राजे सरकारमधील कथित भ्रष्टाचारावर गेहलोत सरकार कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दोन्ही गटांना एकत्र आणणे ही काँग्रेसची देखील सर्वात मोठी समस्या आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Karnatak Election Effect in Rajasthan BJP check details on 15 May 2023.

हॅशटॅग्स

#Karnatak Election Effect(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x