14 December 2024 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर
x

Shinde Camp in Tension | शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक, सुप्रीम कोर्टाच्या निकालाने ठाकरेंना बळ

Shinde Camp in Tension

Shinde Camp in Tension | शिंदे गटाच्या 16 आमदारांना पात्र किंवा अपात्र ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयानं विधान सभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे माध्यमांचं लक्ष लागलंय. त्यालाच अनुसरून आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब विधान सभा सचिवांची भेट घेणार आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अपात्र आमदारांसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा मागणीचं निवेदन ते सचिवांना देण्याची शक्यता आहे.

विधानसभा सचिवांची भेट घेणार
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब आज विधानसभा सचिवांची भेट घेणार आहेत. गुरुवारी सर्वोच्च न्ययालयानं राज्याच्या संत्तासंघर्षावर निकाल दिला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. अनिल परब हे आज सचिवांची भेट घेणार आहेत. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचे पालन करून आपत्र आमदारांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, यासाठी परब सचिवांना निवेदन देण्याची शक्यता आहे.

निवडणुकीपूर्वी शिंदे गट अडचणीत :
दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती कमी होण्याची आणि मविआमध्ये फूट पडण्याची संधी शोधली जात आहे. त्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाच्या हातून शिवसेना पक्ष आणि चिन्ह जाणार?
मीडिया वृत्तानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यानं मुंबई महापालिका निवडणूक पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे, असं म्हटलंय. सुप्रीम कोर्टाने निकालपत्रात तत्कालीन राज्यपालांवर उडलेले ताशेरे, आमदार भरत गोगावले व्हीप म्हणून आणि एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवणं यामुळे जनमतावर झालेला परिणाम या मुंबई महापालिका निवडणुकीबाबत भाजप देखील सावध भूमिका घेत आहे. विशेष म्हणजे निकालपत्रात शिवसेना पक्षाबाबतही काही लिखित मुद्दे निकालपत्रात दिल्याने काही कायदेतज्ज्ञांनी तर शिंदे गटाच्या हातून शिवसेना पक्ष आणि चिन्ह जाण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shinde Camp in Tension MLA Anil Parab will meet the assembly secretary today check details on 15 May 2023.

हॅशटॅग्स

#Shinde Camp in Tension(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x