24 November 2024 10:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Reliance Infrastructure Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअरने 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 745% परतावा दिला, स्टॉकमध्ये मोठी उलाढाल होणार?

Reliance Infrastructure Share Price

Reliance Infrastructure Share Price | दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानी यांच्या बहुतेक सर्व कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. आणि याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या कंपनीच्या शेअर्सवरही पाहायला मिळत आहे. तथापि अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. ही कंपनी मुख्यतः पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात व्यवसाय करते. आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 143.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सेन्सेक्सच्या तुलनेत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 745 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 170 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याचप्रमाणे मागील एक वर्षाच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 45.22 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मात्र गेल्या एक महिनाभरापासून हा स्टॉक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. शुक्रवारी हा स्टॉक 146.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. जानेवारी 2008 मध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 2123 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

संचलकांची बैठक :
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 25 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक पूर्वी 9 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती, मात्र नंतर त्यात बदल करण्यात आला. या बैठकीत कंपनी जानेवारी-मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. यासोबतच कंपनी आपले संपूर्ण आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर करेल.

न्यायालयाचा दिलासा :
मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने अनिल अंबानींच्या यांच्या रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या बाजूने सकारात्मक निकाल दिला आहे. तर रिलायन्स इन्फ्रा कंपनीने पुरवलेल्या वीजेची थकबाकी न भरल्याच्या वादात गोवा सरकारविरुद्ध या प्रकरणाचा निकाल लागला आहे. आता गोवा सरकारला रिलायन्स इन्फ्रा कंपनीला 278 कोटी रुपये थकबाकी रक्कम द्यावी लागणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Infrastructure Share Price today on 16 May 2023.

हॅशटॅग्स

Reliance Infrastructure Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x