26 November 2024 11:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

Grindwell Norton Share Price | ग्रिंडवेल नॉर्टन शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले, अवघ्या 74000 वर दिला 1 कोटी परतावा, डिटेल्स वाचा

Grindwell Norton Share Price

Grindwell Norton Share Price | ‘ग्रिंडवेल नॉर्टन’ या अॅब्रेसिव्ह आणि सिलिकॉन कार्बाइड उत्पादक आणि निर्यातक कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर परतावा देऊन श्रीमंत केले आहे. या मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्टॉकने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 74,000 रुपये गुंतवणुकीवर 1 कोटी रुपये परतावा कमावून दिला आहे.

‘ग्रिंडवेल नॉर्टन’ कंपनीने आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीचे जबरदस्त निकाल जाहीर केले आहेत. यामुळे ब्रोकरेज फर्मने या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.47 टक्के वाढीसह 2,071.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

‘ग्रिंडवेल नॉर्टन’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 21,886.58 कोटी रुपये आहे. औद्योगिक मागणीतील पुनरुज्जीवन आणि कंपनीने अलीकडे PRS पर्मासेलचे संपादन केल्यामुळे ग्रिंडवेल नॉर्टन कंपनीच्या मार्च तिमाहीचे परिणाम चांगले आले आहेत. मार्च तिमाहीत कंपनीने 19 टक्क्यांच्या वाढीसह 660 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. इतर उत्पन्नाच्या आधारावर मार्च तिमाही कालावधीत कंपनीने 11 टक्क्यांच्या वाढीसह 992 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने ‘ग्रिंडवेल नॉर्टन’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या मते मजबूत उत्पादन पोर्टफोलिओ तसेच औद्योगिक, बांधकाम, पेंट, इन्फ्रा आणि मेटल फिनिशिंग सेगमेंट्सकडून मजबूत मागणीमुळे ग्राइंडवेल नॉर्टन कंपनीने मार्च तिमाहीत कमालीची कामगिरी केली आहे.

ब्रोकरेज फर्मच्या मते, ऑटो, बांधकाम आणि गृहनिर्माण क्षेत्रातील मजबूत वाढीमुळे कंपनीच्या कामगिरीत आणखी सुधारणा पाहायला मिळेल. ब्रोकरेज फर्मने ‘ग्रिंडवेल नॉर्टन’ कंपनीच्या शेअरवर 2,215 रुपये लक्ष किंमत देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

74000 वर 1 कोटी परतावा :
23 मे 2003 रोजी ‘ग्रिंडवेल नॉर्टन’ कंपनीचे शेअर्स 14.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 2,071.75 रुपये किमतीवर पोहचला आहे. या 20 वर्षांच्या कालावधीत ‘ग्रिंडवेल नॉर्टन’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 13430 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी ‘ग्रिंडवेल नॉर्टन’ कंपनीच्या स्टॉकमध्ये 74,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य एक कोटीपेक्षा जास्त झाले असते.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात हा स्टॉक 8 टक्के वाढला आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 287 टक्के नफा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Grindwell Norton Share Price today on 17 May 2023.

हॅशटॅग्स

Grindwell Norton Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x