25 November 2024 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN Mutual Fund SIP | SIP चा पैसा वसूल फॉर्म्युला, 7-5-3-1 रुलने होईल 10 कोटींची कमाई, सोपी ट्रिक समजून घ्या - Marathi News Ration Card | रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केवळ 450 रुपयांत सिलेंडर मिळणार, पहा कसं - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: NBCC
x

Gold Price Today | खुशखबर! सोन्याचे दर आजही खाली घसरले, पटापट तुमच्या शहरातील 10 ग्राम सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता त्यात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात झालेल्या घसरणीचा फायदा सर्वसामान्यांना मिळत आहे. पूर्वी विक्रमी पातळीवर पोहोचलेले सोने आता ६१ हजाररुपयांच्या खाली व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीही ७२,००० रुपयांच्या खाली व्यवहार करत आहे. गुरुवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्येही घसरण सुरू आहे.

दिवाळीपर्यंत सोन्याचा दर ८० हजारावर जाणार
सोने-चांदीपासून बनवलेले दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना या वेळी खरेदी केल्यास पूर्वीपेक्षा अधिक फायदा होईल. म्हणजे तुम्हाला आता कमी पैसे खर्च करावे लागतील. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (एमसीएक्स) गुरुवारी मंदी दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किंमतीविक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या. यंदा दिवाळीच्या हंगामात सोन्याचा भाव ६५,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत वाढू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे चांदीचा भाव ८० हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण (24 कॅरेट)
सराफा बाजाराचे दर ररोज जाहीर केले जातात. गुरुवारी जाहीर झालेल्या दरानुसार सोन्याचा भाव 134 रुपयांवरून 60512 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा दर 63 रुपयांनी घसरून 71,745 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचला आहे. याआधी बुधवारी चांदीचा भाव 71808 रुपये आणि सोन्याचा भाव 60646 रुपयांवर बंद झाला होता.

सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण (23 कॅरेट)
सराफा बाजारात गुरुवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 60270 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. गेल्या काही काळापासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. साधारणपणे लोक दागिन्यांसाठी 22 कॅरेट सोनं घेतात, त्यामुळे तुम्हाला 10 ग्रॅमसाठी 55429 रुपये मोजावे लागतात. याशिवाय जीएसटी आणि मेकिंग चार्जेस वेगवेगळे असतील.

एमसीएक्सवर बाजाराचा संमिश्र कल
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवर गुरुवारी चांदी 350 रुपयांनी घसरून 72312 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि सोने 90 रुपयांनी घसरून 60055 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. याआधी बुधवारी सोने 60145 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 72658 रुपये प्रति किलो वर बंद झाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today Updates check details on 18 May 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x