25 November 2024 12:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE
x

Gold Price Today | गुड-न्यूज! सोन्यात दरात घसरण सुरूच, आजही भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | आज सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. मात्र कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे येथे सोने ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीच्या खाली जात आहे. सोन्या-चांदीचे दर घसरल्याने सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

सोन्या-चांदीचे दर घसरत आहेत
गेल्या काही दिवसांत विक्रमी वाढ करणारे सोने एमसीएक्सवर 60,000 रुपयांच्या खाली आणि सराफा बाजारात ६१,००० रुपयांच्या खाली व्यवहार करत आहे. चांदीही 72,000 रुपयांच्या खाली घसरली आहे. शुक्रवारी दोन्ही बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून येत आहे. सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी सध्या दोन्ही धातूंच्या किंमतीत काहीसा दिलासा मिळाला आहे. पूर्वीपेक्षा खरेदी करण्यात ही तुमची पैशांची बचत होईल.

सराफा बाजारात घसरण
आठवड्याच्या अखेरीस सराफा बाजारात सोन्याच्या दरांमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदीने विक्रमी पातळी गाठली होती. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर सोने ६५ हजार आणि चांदीचा भाव ८० हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सराफा बाजारात सोनं किती स्वस्त?
सराफा बाजाराचे दर दररोज दुपारी १२ वाजता जाहीर केले जातात. शुक्रवारच्या दरात संमिश्र कल दिसून आला. म्हणजेच चांदीत वाढ झाली असून सोन्यात घसरण झाली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या दरानुसार, सोने 172 रुपयांनी वाढून 60302 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 338 रुपयांनी वाढून 71834 रुपये प्रति किलो झाली. याआधी गुरुवारी चांदीचा भाव 71496 रुपये आणि सोन्याचा भाव 60474 रुपयांवर बंद झाला होता.

23 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव
शुक्रवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 60,061 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 24 कॅरेट सोन्याचा भाव 49,160 रुपये आहे. गेल्या काही काळापासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे.

एमसीएक्स बाजारात तेजी
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली. एमसीएक्सवर शुक्रवारी सोने 169 रुपयांनी वाढून 59935 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 557 रुपयांनी वाढून 72700 रुपये प्रति किलो झाली. याआधी गुरुवारी सोने 59723 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 72837 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

तुमच्या शहरातील आजचे दर पहा
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५५८०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०८७० रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 55830 रुपये, 24 कॅरेट सोने : 60900 रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५५८०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०८७० रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 55830 रुपये, 24 कॅरेट सोने : 60900 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 55800 रुपये, 24 कॅरेट सोने : 60870 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५५८०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०८७० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५५८३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०९०० रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 55800 रुपये, 24 कॅरेट सोने : 60870 रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५५८०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०८७० रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५५८३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०९०० रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 19 May 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x