23 November 2024 7:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Abbott India Share Price | 'ऍबॉट इंडिया'च्या गुंतवणुकदारांना मिळणार बंपर लाभांश, होणार मजबूत फायदा

Abbott India Share Price

Abbott India Share Price | ‘अॅबॉट इंडिया’ ही फार्मा कंपनी लवकरच आपल्या शेअर धारकांना मोठा लाभ देण्याची तयारी करत आहे. ‘अॅबॉट इंडिया’ कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 325 रुपये लाभांश वाटप करणार आहे. ‘अॅबॉट इंडिया’ कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 19 मे 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत 180 रुपये अंतिम लाभांश आणि 145 रुपये विशेष लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Abbott India Share Price Today)

म्हणजेच, 31 मार्च 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी ‘अॅबॉट इंडिया’ ही फार्मा कंपनी शेअर धारकांना एकूण 325 रुपये लाभांश देणार आहे. शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी ‘अॅबॉट इंडिया’ कंपनीचे शेअर 0.098 टक्के घसरणीसह 20,950.00 रुपये किमतीवर (Abbott India Share Price NSE) क्लोज झाले होते.

कंपनीची कमाई :
अॅबॉट इंडिया कंपनीने मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत 231.42 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 9.46 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मार्च 2022 च्या तिमाहीत ‘अॅबॉट इंडिया’ कंपनीला 211.41 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीमध्ये Abbott India कंपनीचा EPS 108.90 रुपये आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 99.49 रुपये होता.

आर्थिक तपशील :
जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत ‘अॅबॉट इंडिया’ कंपनीने 1392.7 कोटी रुपये निव्वळ उत्पन्न मिळवले होते. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या उत्पन्नात 9.15 टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्च 2022 च्या तिमाहीत अॅबॉट इंडिया कंपनीचे निव्वळ उत्पन्न 1276.07 कोटी रुपये होते.

त्याच वेळी, मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 1343.08 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, जो एका वर्षापूर्वी याच कालावधीत 1254.75 कोटी रुपये संकलित झाला होता. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत कंपनीचा निव्वळ खर्च 1,084.31 कोटी रुपये नोंदवला गेला होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत 983.77 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Abbott India Share Price today on 20 May 2023.

हॅशटॅग्स

Abbott India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x