22 November 2024 7:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

SBI Share Price | एसबीआय बँकेच्या गुंतवणूकदारांना मिळणार डिव्हीडंड, आता शेअरची पुढील टार्गेट प्राईस पहा

SBI Share Price

SBI Share Price | भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी ‘एसबीआय बँक’ चे शेअर्स शकुरवरच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.25 टक्के वाढीसह 575.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल अपेक्षेपेक्षा चांगले दिले आहेत. या तिमाहीत बँकेचा नफा व उत्पन्न अनेक पटींनी वाढले आहे. (SBI Share Price NSE)

जानेवारी-मार्च दरम्यान SBI बँकेने सुमारे 16,694 कोटी रुपये निव्वळ नफा कमवका आहे. तिमाही निकालासोबात SBI बँकेने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 1130 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ब्रोकरेज हाऊसेस एसबीआय बँक स्टॉकवर सकारात्मक असून स्टॉक खरेदीचा सल्ला देत आहे. (SBI Share Price BSE)

ब्रोकरेज फर्मचे मत :
ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSA ने SBI बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 725 रुपये निश्चित केली आहे. मॉर्गन स्टॅनलीने SBI बँकेच्या स्टॉकवर 715 रुपये लक्ष किमतीसह ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. कर्जात घट आणि प्रॉफिट मार्जिन वाढल्यामुळे SBI बँकेच्या तिमाही नफ्यात जबरदस्त वाढ झाली आहे.

जेपी मॉर्गन फर्मने SBI बँक स्टॉकवर 720 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. तज्ञांनी SBI स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देखील कायम ठेवली आहे. बँकेचे व्याज उत्पन्न अंदाजापेक्षा 11 टक्के जास्त नोंदवले गेले आहे. जेफरीज फर्मने SBI बँकचे शेअर्स 760 रुपये लक्ष्य किमतीसह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

तर Goldman Sachs फर्मने SBI बँक स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला देत 746 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. सिटी फर्मने 710 रुपये लक्ष्य किमतीसह स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मॅक्वेरी फर्मने SBI बँक स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग देऊन 695 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

लाभांश वाटप :
एसबीआय बँकने मार्च 2023 तिमाहीत 16,694.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत SBI बँकेने 9114 कोटी रुपये नफा कमावला होता. SBI बँकेची व्याजातून मिळणारी कमाई म्हणजेच NII देखील वाढला आहे. SBI बँकेचे स्टँडअलोन एनआयआय 40,392 कोटी रुपये नोंदवले गेले आहे, जे मागील वर्षी मार्च तिमाहीत 31,198 कोटी रुपये होते. तिमाही आधारावर, NPA 0.77 टक्केवरून कमी होऊन 0.67 टक्केवर आला आहे. सकल NPA तिमाही आधारावर 3.14 टक्क्यांवरून कमी होऊन 2.78 टक्क्यांवर आला आहे.

SBI बँकेने म्हटले आहे की, त्यांची एनपीए तरतूद 3262 कोटी रुपयांवरून कमी होऊन 1278 कोटी रुपयेवर आली आहे. स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, SBI बँकेने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त मोठा लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. SBI बँक आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 11.30 रुपये लाभांश वाटप करणार आहे.

बँकेने आपल्या 1 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर 1130 टक्के लाभांश वाटपाला मंजुरी दिली आहे. SBI बँक आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांशावर अंतिम निर्णय घेईल. त्यानंतर एजीएमच्या 30 दिवसांच्या आत, लाभांशाची रक्कम गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केली जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Share Price today on 20 May 2023.

हॅशटॅग्स

#SBI Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x