Sarkari Share | या सरकारी बँकेच्या FD गुंतवणुकीपेक्षा याच बँकेचे शेअर खरेदी करा, 1 वर्षात दिला 87 टक्के परतावा, FD देईल?
Sarkari Share | ‘बँक ऑफ बडोदा’ चे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळवून देत आहेत. या PSU बँकेने जानेवारी-मार्च 2023 तिमाहीमध्ये निव्वळ नफ्यात 168 टक्के वाढ नोंदवली आहे. तर या बँकेचे व्याज उत्पन्नही 33 टक्क्यांनी वाढले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीच्या निकालांनंतर ब्रोकरेज फर्म बँक ऑफ बडोदाच्या स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. (Bank of Baroda Share Price NSE)
बहुतांश तज्ञांज या बँकेचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या सरकारी बँकेच्या शेअरमध्ये मागील एका वर्षभरात 87 टक्क्यांची वाढ झाली आहे. तिमाही निकालासोबत बँक ऑफ बडोदाने आपल्या शेअर धारकांना प्रति इक्विटी शेअर 5.50 रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी बँक ऑफ बडोदाचे शेअर्स 0.75 टक्के वाढीसह 181.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Bank of Baroda Share Price BSE)
बँक ऑफ बडोदा शेअरची लक्ष्य किंमत :
ब्रोकरेज फर्म नुवामाने बँक ऑफ बडोदाचे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच तज्ञांनी प्रति शेअर किंमत लक्ष किंमत 220 रुपये निश्चित केली आहे. प्रत्येक तिमाहीत बँक नवीन उच्चांक स्पर्श करत आहे. या बँकेच्या ताळेबंदात तिमाही काळात सरासरीपेक्षा चांगली वाढ पाहायला मिळाली आहे. मार्च तिमाहीत मालमत्तेच्या गुणवत्तेत ही मोठी सुधारणा पाहायला मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या बँकेने 1.3 टक्के ROA नोंदवला आहे. ब्रोकरेज फर्मचा विश्वास आहे की PSU बँक स्टॉकचे प्रीमियम मूल्यांकन सुरू राहील.
मोतीलाल ओसवाल फर्मने बँक ऑफ बडोदाचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी स्टॉकवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 240 रुपये जाहीर केली आहे. मार्च 2023 तिमाहीत कमाईची स्थिर राहिली असून तिमाही आधारावर मार्जिन 16 बेसिस पॉइंट्सने मजबूत झाले आहे. Emkay फर्मने बँक ऑफ बडोदा स्टॉकवर 230 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, बँक ऑफ बडोदाची आरओए डिलिव्हरी खूप मजबूत आहे. बँक भविष्यात विमा उपकंपनीद्वारे नवीन व्यापारी शक्यतांचा शोध घेत आहे.
CLSA फर्मने BoB स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी बँक ऑफ बडोदा स्टॉकवर 225 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. मॉर्गन स्टॅनलीने बँक ऑफ बडोदा स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि त्यासाठी लक्ष किंमत 240 रुपये निश्चित केली आहे. सिटी फर्मने स्टॉकवर बाय रेटिंग 220 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. तर एचएसबीसीने 230 रुपये लक्ष किमतीसाठी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
लाभांश तपशील :
जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत बँक ऑफ बडोदाने 168 टक्के वाढीसह 4,775 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. FY23 मध्ये 94 टक्के वाढीसह 14,110 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये बँकेने 7,272 कोटी निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 च्या तिमाहीत बँकेचे व्याज उत्पन्न 34 टक्क्यांच्या वाढीसह 11,525 कोटी रुपयेवर पोहोचले होते.
मागील वर्षी बँकेचे व्याज उत्पन्न 8,612 कोटी रुपये होते. निव्वळ व्याज मार्जिन देखील वाढून 3.31 टक्क्यांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी याच तिमाहीत 3.03 टक्के नोंदवले गेले होते. मार्च 2023 च्या तिमाहीत बँक ऑफ बडोदाचा एकूण NPA 3.79 टक्के नोंदवला गेला होता.
बँक ऑफ बडोदाच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2023 साठी 5.5 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे. या बँकेच्या शेअरचे दर्शनी मूल्य प्रति इक्विटी शेअर 2 रुपये आहे. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 275 टक्के लाभांश मिळणार आहे. BoB चा स्टॉक 17 मे 2023 रोजी 186 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Bank of Baroda Share Price Today on 20 May 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल