23 November 2024 12:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

लोकसभा निवडणुकांसाठीच भाजपने 2 हजाराच्या नोटा बंद केल्या, राज्यातील 48 जागा जिंकण्यासाठी ते काहीही करू शकतात - प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

Praksh Ambedkar | एकाबाजूला आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. तीन दिवसांपूर्वी पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपचे राज्यातील सर्व संघटनेतील पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते.

आता मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक
या बैठकीनंतर आता मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर भाजपमध्ये काही संघटनात्मक बदल करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे. भाजपकडून मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी मिशन दिडशेची आखणी करण्यात आली आहे. यातंर्गत मुंबई महापालिकेत दिडशे जागा जिंकून सत्ता मिळवण्याचं भाजपचं नियोजन आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
दरम्यान, येणाऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. त्यासाठीच भाजपने 2 हजाराच्या नोटा बंद केल्या आहेत. निवडून येण्यासाठीचं भाजपचं हे चोकिंग राजकारण आहे. विरोधकांना निधी मिळू नये हा त्यामागचा हेतू आहे. त्यासाठीच भाजपने ही खेळी खेळली आहे. त्यामुळे येथील राजकीय पक्षांनी गाफिल राहू नये. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

महागाईचा मुद्दा विरोधकांनी लावून धरावा – प्रकाश आंबेडकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेत युनायटेड नेशनमध्ये दौऱ्यावर जाणार आहेत. पण त्यांना निमंत्रण दिलेले आहे का? भाजप आणि आरएसएसने देशात आणि देशाच्याबाहेर जागतिक पंतप्रधान आणि सर्वश्रेष्ठ असल्याचा धिंडोरा पिटवाला. त्यामुळे भारतात असलेली कॉलमनी हे युरोप देश भारताला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. असे झाल्यास जुलैमध्ये पैसे विड्रॉल होईल आणि त्यानंतर भारतात महागाईला वाढेल. याकडे राष्ट्रीय पक्षांनी लक्ष देऊन हा मुद्दा लावून धरावा, असं ते म्हणाले.

महाराष्ट्र जिंकण्यासाठी अमित शाह काहीपण करू शकतात
अमित शाह यांनी महाराष्ट्रात 48 जागा जिंकण्यासाठी शिवसेनेला कमकुवत केले आहे. पुढच्या काळात ईडी आणि नाबार्डच्या रिपोर्टखाली राष्ट्रवादी पक्ष कमकुवत केले जाऊ शकतात. 48 जागा जिंकण्यासाठी अमित शाह काहीपण करू शकतात, असंही ते म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Loksabha Election in October November said VBA Chief Prakash Ambedkar check details on 21 May 2023.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x