23 November 2024 9:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

2000 Notes Exchange | रांगेत करोडपती-अब्जाधीश दिसतील? सामान्य लोकांना 2000 च्या नोटा बदलताना फॉर्मवर सर्व माहिती द्यावी लागणार

2000 Notes Exchange

2000 Notes Exchange | भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत 2000 रुपयांच्या नोटा (2000 Rs Notes) परत घेण्याबाबतचं परिपत्रक जारी केले आहे. या अंतर्गत बँक 2000 रुपयांच्या नोटा बाजारातून काढून घेईल आणि सप्टेंबर 2023 नंतर या नोटा चलनातून बाद होतील. आरबीआयने नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही तारीख निश्चित केली आहे.

8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने फिकट गुलाबी रंगाची ही नोट जारी केली होती. चलन व्यवस्थेतील हा सर्वात मोठा बदल होता, कारण याआधी 1000 रुपयांचे चलन सर्वात मोठे चलन होते. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी केली तेव्हा त्यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे सर्वाधिक ब्लॅक मनी असतो असे करोडपती आणि अब्जाधीश बँकांच्या रांगेत कुठेही दिसले नव्हते. दिसले होते ते केवळ सामान्य लोकं हा सर्वांचा अनुभव आहे. तसेच करोडपती आणि अब्जाधीश लोकांना घरपोच सेवा मिळत होती आणि कमिशन घेऊन कसे प्रकार सुरु होते याची वृत्त देखील तेव्हा प्रसिद्ध झाली होती. आता पुन्हा सामान्य लोकं त्रास सहन करणार आहेत. विशेष म्हणजे सामान्य लोकांचा पैसा आता आयटीआरच्या अखत्यारीत येणार आहे. कारणही तसंच आहे.

एक फॉर्म भरावा लागेल
दोन हजाराच्या नोटा 23 मे पासून बँकांमध्ये बदलण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी दोन दिवस राहिले आहेत. यामुळे बँकांनी तयारी सुरू केली आहे. बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी फक्त बँकिंग नियमांचे पालन करावे लागेल, असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे. RBI च्या म्हणण्यानुसार बँकेच्या शाखेतून 2000 रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मचे स्वरूप आरबीआयने जारी केले आहे. विशेष म्हणजे केवळ 2000 च्या नोटा बदलण्यासाठी लोकांना फॉर्म भरावा लागणार आहे. काळ्या पैशाला आळा घालणे हा या पाऊलाचा उद्देश आहे असं सांगण्यात आलं आहे. मात्र आता या देशात सामान्य लोकच काळा पैसा कमावतात असच चित्र निर्माण होतंय.

यांना फॉर्म भरण्याची गरज नाही
जर एखादी व्यक्ती त्याच्या खात्यात 2000 ची नोट जमा करत असेल तर त्याला फॉर्म भरण्याची गरज नाही. फॉर्ममध्ये, तुम्हाला तुमचे नाव, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतीही एक ओळखपत्र पुरावा म्हणून दाखवावा लागणार आहे. जर समजा तुम्ही ओळख म्हणून आधार कार्ड देत असाल तर तुम्हाला त्याचा नंबर फॉर्ममध्ये लिहावा लागेल. तसेच इतर कागदपत्रे दिल्यास त्याचा क्रमांक फॉर्मवर लिहिणे आवश्यक आहे. मात्र यामुळे सामान्य लोकांनी त्यांच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवलेली कॅश इन्कम टॅक्सच्या अखत्यारीत येणार आहे.

नोटांची संख्या
याशिवाय तुम्हाला 2000 रुपयांच्या किती नोटा बदलून घ्यायच्या आहेत आणि त्यांची किंमत किती आहे हे देखील फॉर्ममध्ये नमूद करावे लागेल. हा फॉर्म बँकांच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असणार आहे. हा फार्म भरल्यानंतरच कोणालाही 2000 रुपयांच्या नोटा बदता येणार आहे.

नोट बदलण्याची मर्यादा
23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या नोट बदलता येणार आहे. कोणताही व्यक्ती कोणत्याही बँकेत जाऊन या नोटा बदलून घेऊ शकतो. एका वेळेस फक्त 20,000 रुपये बदलता येणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 2000 Notes Exchange bank form check details on 21 May 2023.

हॅशटॅग्स

#2000 Notes Exchange(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x