22 November 2024 6:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News
x

सिरीयल बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेत उसळली दंगल; समाज माध्यमांवर बंदी

Facebook

कोलंबो : श्रीलंकेमध्ये २१ एप्रिलला चर्च आणि हॉटेलांबाहेर झालेल्या ८ साखळी बॉम्बस्फोटांचे पडसाद आता उमटू लागले आहेत. तेथील नेगोंबोमध्ये स्थानिक सिंहली आणि मुस्लिमांदरम्यान दंगल भडकली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून श्रीलंकन सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर सुमित अटापट्टू यांनी सांगितले की, परिस्थिती सध्या नियंत्रणात आणण्यासाठी कर्फ्यु लावण्यात आला आहे. काल सदर घटना घडली. अफवांना रोखण्यासाठी समाज माध्यमांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

श्रीलंकेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये नेगोंबोतील एका चर्चचाही समावेश होता. परंतु, मागील १५ दिवसांमध्ये दोन समुदायांमध्ये झालेला हा पहिला प्रकार होता. रविवारी अधिकारी शहरातील शाळा पुन्हा सुरु करण्याच्या तयारीत असताना दंगल उसळली. समाजकंटकांनी मोटारसायकल, कारच्या काचा फोडल्या. या भागावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने विशेष सुरक्षा दलाला पाचारण केले असून पोलीस तपास करत आहेत.

श्रीलंकेमध्ये सरकारने आपत्कालीन आणीबाणी लागू केली होती. यावेळी सुमारे १०,००० सैनिक दहशतवादी ठिकाणांवर छापेमारी करत आहेत. आतापर्यंत १०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांचा एक चमूही आहे. सुरक्षा दलांना तेथे कारवाई करण्यासाठी पूर्ण सूट देण्यात आली आहे. मागील वर्षी देखील श्रीलंकेमध्ये बौद्ध सिंहला आणि मुस्लिमांमध्ये दंगल उसळली होती. मुस्लिम संस्था बौद्धांचे जबरदस्ती धर्मपरिवर्तन करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हाही सरकारला कर्फ्यू लावाला लागला होता.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x