23 November 2024 2:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

BPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मजबूत लाभ देणार, प्रथम जाहीर केला डिव्हीडंड, फायदा घेण्यासाठी डिटेल्स जाणून घ्या

Highlights:

  • सेबीला दिलेल्या माहितीमध्ये
  • कंपनी देणार लाभांश
  • 1,807 कोटी रुपये निव्वळ नफा
  • मागील 6 महिन्यांत 16 टक्के परतावा
BPCL Share Price

BPCL Share Price | ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ म्हणजेच ‘BPCL’ या सरकारी कंपनीने आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 च्या Q4 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपनी ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीने 6,478 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

सेबीला दिलेल्या माहितीमध्ये
बीपीसीएल कंपनीने सोमवारी सेबीला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, एका वर्षापूर्वी याच तिमाहीत BPCL कंपनीने 2,501 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. रिफायनिंग आणि फ्युएल मार्केटिंग मार्जिनमध्ये जबरदस्त सुधारणा झाल्यामुळे BPCL कंपनीच्या तिमाही नफ्यात वाढ पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी BPCL कंपनीचे शेअर्स 0.068 टक्के घसरणीसह 366.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनी देणार लाभांश :
बीपीसीएल कंपनी आपल्या तिमाही निकालासोबत गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरवर गुंतवणूकदारांना 4 रुपये लाभांश दिला जाणार आहे.

1,807 कोटी रुपये निव्वळ नफा
चौथ्या तिमाहीच्या उत्कृष्ट निकालांमुळे BPCL कंपनीने संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1,807 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती स्थिर असल्याने कंपनीला तोटा भरून काढण्यास मदत झाली होती.

मागील 6 महिन्यांत 16 टक्के परतावा
बीपीसीएल कंपनीने मागील वर्षी एप्रिल 2022 पासून पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत वाढ केली नाही. तरी देखील आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे दुसऱ्या सहामाहीत कंपनीच्या रिफायनिंग मार्जिनमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा पाहायला मिळाली आहे. मागील 6 महिन्यांत BPCL कंपनीच्या शेअरची किंमत 16 टक्क्यांनी वर गेली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BPCL कंपनीचे शेअर्स 0.50 टक्क्यांच्या वाढीसह 362.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BPCL Share Price today on 24 May 2023.

FAQ's

How to Buy BPCL Share?

आपण भारत पेट्रोलिअम कॉपोरेशनचे शेअर्स Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून खरेदी करू शकता.

What is the Share Price of BPCL?

कोणत्याही शेअरच्या शेअरची किंमत अस्थिर असते आणि वेगवेगळ्या घटकांमुळे दिवसभर बदलत राहते. बीपीसीएलच्या शेअरची किंमत २३ मे २०२३ रोजी रु.३६०.३० आहे.

What is the Market Cap of BPCL?

मार्केट कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपसाठी कमी, सार्वजनिकरित्या व्यवहार केलेल्या कंपनीच्या थकित शेअर्सचे बाजार मूल्य आहे. 23 मे 2023 पर्यंत बीपीसीएलचे मार्केट कॅप 79,274 कोटी रुपये आहे.

What is the PE and PB ratio of BPCL?

बीपीसीएलचे पीई आणि पीबी गुणोत्तर 24 मे 2023 रोजी 36.66 आणि 1.48114 आहे

What is the 52 Week High and Low of BPCL?

५२ आठवड्यांचा उच्चांक/नीचांकी दर हा त्या दिलेल्या कालावधीत (१ वर्षासारखा) बीपीसीएलच्या समभागाने व्यवहार केलेला सर्वोच्च आणि सर्वात कमी भाव आहे आणि तो तांत्रिक सूचक मानला जातो. बीपीसीएलचे 52 आठवड्यांचे उच्चांकी आणि नीचांकी मूल्य 23 मे 2023 रोजी रु.374.90 आणि रु.288.05 आहे.

हॅशटॅग्स

BPCL share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x