23 November 2024 9:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

LIC Share Price | एलआयसीच्या नफ्यात अप्रतिम मोठी वाढ, पण LIC शेअरला फायदा होऊन तेजी येणार का? डिटेल्स जाणून घ्या

Highlights:

  • एलआयसी शेअरची सध्याची किंमत
  • प्रत्येक शेअरवर लाभांश देणार
  • कमाईचे तपशील
LIC Share Price

LIC Share Price | भारत सरकारच्या मालकीची सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या नफ्यात 5 पट वाढ नोंदवली गेली आहे. जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत एलआयसी विमा कंपनीने 13427.8 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या मार्च तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत एलआयसी कंपनीच्या नफ्यात 466 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

एलआयसी शेअरची सध्याची किंमत
एलआयसी कंपनीने मागील वर्षीच्या मार्च तिमाहीत 2371.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. गुरुवारी एलआयसी कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 613.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.041 टक्के वाढीसह 603.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

प्रत्येक शेअरवर लाभांश देणार
एलआयसी कंपनीने तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर आपल्या शेअर धारकांना प्रत्येक शेअरवर 30 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच LIC कंपनी आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रति शेअर 3 रुपये लाभांश देणार आहे. एलआयसी कंपनी लाभांश पेमेंटवर एकूण 1897 कोटी रुपये खर्च करणार आहे.

मार्च 2023 च्या तिमाहीत एलआयसी कंपनीने आपल्या गैर-सहभागी निधीतून शेअर होल्डर्स फंडमध्ये 7299 कोटी रुपये हस्तांतरित केले होते. LIC कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीत 8428.5 कोटी रुपये निव्वळ कमिशन उत्पन्न मिळवले आहे, जे मागील वर्षीच्या तुलनेत 5.4 टक्के जास्त आहे.

कमाईचे तपशील
जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत, एलआयसीच्या निव्वळ प्रीमियम उत्पन्नमध्ये वार्षिक आधारावर 8.3 टक्क्यांची वास झाली असून, कंपनीने 1.31 लाख कोटी रुपये कमाई केली आहे. तथापि कंपनीचे प्रीमियम उत्पन्न तिमाही आधारावर 17.9 टक्के वाढले आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत एलआयसी कंपनीचा पहिल्या वर्षाचा प्रीमियम 12.33 टक्के घसरणीसह 12811.2 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

त्याच वेळी, नूतनीकरण प्रीमियम 6.8 टक्के वाढीसह 76009 कोटी रुपयेवर पोहचला आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 साठी एलआयसी चा निव्वळ नफा अनेक पटींनी वाढून 35,997 कोटी रुपये नोंदवला गेला आहे, जो मागील आर्थिक वर्षात 4125 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| LIC Share Price today on 26 May 2023

FAQ's

How to Buy Life Insurance Corporation of India Share?

आपण एलआयसी शेअर्स Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून खरेदी करू शकता.

What is the Share Price of Life Insurance Corporation of India?

कोणत्याही शेअरच्या शेअरची किंमत अस्थिर असते आणि वेगवेगळ्या घटकांमुळे दिवसभर बदलत राहते. भारतीय आयुर्विमा महामंडळ लिमिटेडच्या शेअरची किंमत 26 मे 2023 रोजी रु.६०४ आहे.

What is the Market Cap of Life Insurance Corporation of India?

मार्केट कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपसाठी कमी, सार्वजनिकरित्या व्यवहार केलेल्या कंपनीच्या थकित शेअर्सचे बाजार मूल्य आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ लिमिटेडचे मार्केट कॅप 26 मे 2023 रोजी 3,81,777 कोटी रुपये आहे.

What is the PE and PB ratio of Life Insurance Corporation of India?

भारतीय आयुर्विमा महामंडळ लिमिटेडचे पीई आणि पीबी गुणोत्तर 26 मे 2023 रोजी 10.60622 आणि 8.25769 आहे.

What is the 52 Week High and Low of Life Insurance Corporation of India?

भारतीय आयुर्विमा महामंडळ लिमिटेडच्या शेअरने त्या दिलेल्या कालावधीत (१ वर्षासारखा) व्यवहार केलेला ५२ आठवड्यांचा उच्चांकी/नीचांकी दर हा सर्वोच्च आणि सर्वात कमी दर आहे आणि तो तांत्रिक निर्देशांक मानला जातो. भारतीय आयुर्विमा महामंडळ लिमिटेडचे 52 आठवड्यांचे उच्चांकी आणि नीचांकी मूल्य 26 मे 2023 रोजी रु.852.70 आणि रु.530.05 आहे.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(104)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x