23 November 2024 5:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Loksabha 2024 | 3 दिवसांपूर्वी मोदींची स्तुती करणारे मुख्यमंत्री नवीन पटनायक अचानक पलटले, नीती आयोगाच्या बैठकीपासून स्वत:ला दूर का ठेवले?

CM Naveen Patnaik

Loksabha 2024 | ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पुरी येथून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते आणि पुरी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र, शनिवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या महत्त्वपूर्ण बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत. त्याच्या या आकस्मित निर्णयाने भाजपाला धक्का बसला आहे.

नवीन पटनायक नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार होते, पण त्यांनी शेवटच्या क्षणी आपले वेळापत्रक बदलले. विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीत बीजेडीने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेचा आढावा सध्या ते घेत आहेत असं वृत्त आहे. नवीन पटनायक यांनी 29 मे 2019 रोजी पाचव्यांदा ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

नवीन पटनायक, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भागवत मान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन या बैठकीला उपस्थित नव्हते.

नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या अनुपस्थितीवर बीजेडी नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र तळागाळातील राजकारणी म्हणून नवीन पटनायक यांनी टीव्ही, वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावर भाजप आणि मोदी यांच्याशी वाढत्या जवळीकमुळे अजून फार मोठ्या प्रमाणात टीकेचे धनी झालेले नाहीत असं राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. मात्र महागाई आणि बेरोजगारीमुळे देशातील एकूण राजकीय वातावरण भाजपचया विरोधात असल्याचे संकेत आता सर्वच राज्यातील स्थानिक नेत्यांना दिसू लागले आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला गैरहजर राहण्यापेक्षा संदेश देण्याचा चांगला मार्ग कोणता असू शकतो असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

२००० रुपयांच्या नोटांवरून ओडिशातील जनतेत प्रचंड नाराजी
माजी अर्थमंत्री आणि बीजदचे ज्येष्ठ आमदार शशीभूषण बेहरा यांनी केंद्र सरकारच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या आदेशावर केलेली टीका हे बीजेडी समान राजकारण करण्यात पारंगत असल्याचे द्योतक आहे, असे एका राजकीय विश्लेषणातून समोर आले आहे. असे निर्णय घेऊन मोदी सरकार आर्थिक अस्थिरता निर्माण करत आहे, असा आरोप बेहरा यांनी केला होता. राजकीय विश्लेषक सत्य प्रकाश दास म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या हिरवा कंदीलशिवाय बेहरा यांनी २००० रुपयांच्या नोटांवरील निर्णयावर कधीही टीका केली नसती.

News Title: CM Naveen Patnaik absence in Niti Aayog meeting check details on 28 May 2023.

हॅशटॅग्स

#CM Naveen Patnaik(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x