26 April 2025 10:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Suzlon Share Price | सुझलॉन शेअर फोकसमध्ये; 6 महिन्यात 18% घसरला, आता अपडेट खुश करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | मजबूत परतावा देणारा शेयर; टाटा स्टील शेअरची पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL NTPC Share Price | एनटीपीसी शेअर पुन्हा मालामाल करणार, यापूर्वी 464% परतावा दिला - NSE: NTPC Horoscope Today | 27 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Nucleus Software Services Share Price | न्यूक्लियस सॉफ्टवेअर सर्व्हिसेस शेअरने 5 दिवसात 52 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?

Highlights:

  • Nucleus Software Services Share Price
  • शेअरधारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा
  • तिमाही आर्थिक कामगिरी
  • गुंतवणूकदारांना 107 टक्के परतावा दिला
Nucleus Software Services Share Price

Nucleus Software Services Share Price | ‘न्यूक्लियस सॉफ्टवेअर सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून जबरदस्त तेजीत धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 809.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या शेअरमध्ये इतकी जबरदस्त वाढ होण्याच्या कारण म्हणजे कंपनीने आपल्या शेअर धारकांना 100 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

शेअरधारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा

न्यूक्लियस सॉफ्टवेअर कंपनीने सेबीला दिलेल्या अहवालात कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवारच्या बैठकीत आपल्या पात्र शेअरधारकांना 10 रुपयेच्या दर्शनी मूल्याच्या शेअरवर 100 तक्के म्हणजेच 10 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.00 टक्के वाढीसह 971.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तिमाही आर्थिक कामगिरी

न्यूक्लियस सॉफ्टवेअर कंपनीने लाभांश घोषणे सोबत चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकालही जाहीर केले आहे. मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 22 टक्क्यांच्या वाढीसह 206 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. या तिमाहीत कंपनीने 73 टक्के वाढीसह 82.48 कोटी रुपये ऑपरेटींग प्रॉफिट कमावला आहे. त्याच वेळी मार्च तिमाहीत तिमाहीत कंपनीने 76 टक्के वाढीसह 67.65 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. पूर्ण आर्थिक वर्ष 2023 मध्ये न्यूक्लियस सॉफ्टवेअर कंपनीच्या नफ्यात तिप्पट वाढ होऊन कंपनीने 128 कोटी रुपये नफा कमावला आहे.

गुंतवणूकदारांना 107 टक्के परतावा दिला

न्यूक्लियस सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनीच्या स्टॉकने 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीचे शेअर्स 391 रुपये किमतीवर उपलब्ध होते. आज हा स्टॉक 971.15 रुपये किमतीवर पोहचला आहे. 2023 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 107 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 35.87 टक्के नफा कमावून दिला हिता. मागील 5 दिवसात या शेअरची किंमत 52.47 टक्के वाढली आहे.

न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स ही कंपनी मुख्यतः सॉफ्टवेअर बनवण्याचे काम करते. ही कंपनी बँकिंग आणि वित्तीय कंपन्यांना कर्ज आणि व्यवहारांशी संबंधित IT सेवा प्रदान करण्याचे काम करते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.16 हजार कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nucleus Software Services Share Price today on 29 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Nucleus Software Services Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या