15 January 2025 8:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
x

Plan 475 | ममता-नितीश यांचा प्लॅन 475 काय आहे? 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने 52 जागा जिंकल्या होत्या तर 209 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते

Highlights:

  • Plan 475
  • १२ जून रोजी पाटण्यात बैठक
  • विरोधकांच्या गोटातही जलद तयारी
  • विरोधी गटात सुरू असलेल्या प्लॅन 475 मध्ये नेमकं काय?
  • लोकसभेच्या किमान 475 जागा भाजपविरोधात लढवण्याची योजना
  • काँग्रेस ३०० पेक्षा कमी जागा लढवायला तयार होणार का?
  • अडचण काय?
  • 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने 261 जागा जिंकल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहिला
  • काँग्रेस किती झुकू शकते? आता सगळा खेळ कशावर अवलंबून?
Loksabha Election 2024

Plan 475 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धोबीपछाड आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी आणि अमित शहा यांची निवडणूक रणनीती यांना प्रत्युत्तर शोधत असलेल्या जेडीयूचे नितीशकुमार आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी प्लॅन ४७५ तयार केला आहे. प्लॅन ४७५ चा आराखडा सर्वप्रथम ममतांनी सादर केला आहे.

१२ जून रोजी पाटण्यात बैठक
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेते १२ जून रोजी पाटण्यात बैठकीसाठी जमले असता वैचारिक ऐक्य आणि सामायिक विधानांवर चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील रणनितीक लढाईचा रोडमॅप सर्वांसमोर यावा, यासाठी जेडीयूने यावर थोडे अधिक काम केल्याचे संकेत मिळत आहेत.

विरोधकांच्या गोटातही जलद तयारी
लोकसभा निवडणुकीची तयारी विरोधकांच्या गोटातही जलद झाली असून, १२ जून रोजी पाटणा येथे जेडीयूचे सर्वेसर्वा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आयोजित केलेल्या भाजपविरोधी पक्षांच्या पहिल्या औपचारिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या राजकीय पक्षांना काँग्रेससोबत या टप्प्यावर थेट बोलायचे नाही, अशा पक्षांना आकर्षित करण्याची जबाबदारी काँग्रेसने नितीश यांच्यावर सोपवली आहे अशी माहिती आहे. नितीश कुमार यांच्या राजकीय हालचाली पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकल्या आहेत, त्यानंतर १२ जूनची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सुमारे दीड डझन भाजपविरोधी पक्षांचे नेते पाटणापर्यंत पोहोचू शकतात, अशी चर्चा आहे.

विरोधी गटात सुरू असलेल्या प्लॅन 475 मध्ये नेमकं काय?
मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी यांनी नितीश कुमार यांना 475 जागांचा प्लॅन दिला आहे, ज्यावर काँग्रेसशी चर्चा करून पुढील चर्चा केली जाईल. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती सारखीच असल्याने अखिलेश यादव सुद्धा विरोधकांच्या ऐक्यावर ममतांचा आवाज बुलंद करत आहेत. काँग्रेसने जवळपास २०० जागा लढवाव्यात आणि बलाढ्य असलेल्या उर्वरित जागांवर प्रादेशिक पक्षांना प्राधान्य द्यावे, असेही ममतांनी जाहीरपणे सांगितले आहे.

लोकसभेच्या किमान 475 जागा भाजपविरोधात लढवण्याची योजना
प्लॅन 475 अंतर्गत ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांनी लोकसभेच्या 543 जागांपैकी किमान 475 जागा भाजपविरोधात लढवण्याची योजना आखली आहे. उमेदवार काँग्रेसचा असो वा अन्य कोणत्याही पक्षाचा, पण मतांची विभागणी होऊ नये आणि २०२४ मध्ये सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकण्यापासून रोखण्यासाठी भाजपला समोरासमोरच्या लढाईत पराभूत करणं शक्य होईल.

काँग्रेस ३०० पेक्षा कमी जागा लढवायला तयार होणार का?
४७५ जागांसाठी उमेदवार देण्याच्या फॉर्म्युल्यात २०१९ मध्ये जिंकलेल्या जागा ही सूत्रातील सर्वात महत्त्वाची भूमिका असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मूळ फॉर्म्युला असा आहे की २०१९ मध्ये ज्या पक्षाने ही जागा जिंकली ती त्या पक्षाकडे असावी. दुसऱ्या क्रमांकावरील पक्षाला प्राधान्य देणे हा फॉर्म्युल्याचा दुसरा टप्पा आहे. या फॉर्म्युल्यावर काँग्रेससोबत जागावाटपाबाबत एकमत होण्यासाठी प्रादेशिक पक्ष प्रयत्न करतील. एखाद्या जागेवर नंबर १ आणि २ असलेला पक्ष विरोधी गटात नसेल तर तिसऱ्या क्रमांकावरील पक्षाला महत्त्व द्यायला हवे. सारांश म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत ज्या विरोधी गटाला सर्वाधिक मते मिळाली, त्या पक्षाला त्या जागेचा हक्क समजायला हवा असा त्यामागील संदेश आहे.

अडचण काय?
अडचण अशी आहे की, जर काँग्रेसने हा फॉर्म्युला स्वीकारला तर २०२४ च्या निवडणुकीत २५० पेक्षा थोड्या जास्त किंवा कमी जागा लढवाव्या लागतील जिथे ते जिंकले किंवा किमान दुसऱ्या स्थानावर राहिले. अशा तऱ्हेने विरोधकांनी युती जिंकली तर सरकार चालवण्याचे आणि पाडण्याचे बटण कोलकात्यापासून चेन्नईपर्यंत पसरले जाईल. पण थेट लढतीत काँग्रेसला भाजपशी चढाओढ लागली आहे.

2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने 261 जागा जिंकल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहिला
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 189 जागांच्या थेट लढतीत 166 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये 192 जागांवर समोरासमोर झालेल्या लढतीत भाजपने 176 जागा जिंकल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने 52 जागा जिंकल्या होत्या आणि 209 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने 44 जागा जिंकल्या होत्या आणि 224 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होते.

काँग्रेस किती झुकू शकते? आता सगळा खेळ कशावर अवलंबून?
काँग्रेस सध्या ज्या परिस्थितीत आहे, त्यात २०२४ मध्ये भाजपला हटवण्यासाठी प्रादेशिक पक्षांशी जागांची सौदेबाजी करण्यासाठी कितपत झुकता येईल, यावरच आता सगळा खेळ अवलंबून असणार आहे. आधी संख्याबळ गोळा करावं लागेल आणि नंतर सर्वात मोठा पक्ष सरकारचं नेतृत्व करेल, हे जर प्रादेशिक पक्षांना काँग्रेसला पटवून देण्यात यश आलं, तर गोष्टी घडू शकतात. यामध्ये पश्चिम बंगाल किंवा उत्तर प्रदेशात सपा आयत्यावेळी काय भूमिका घेणार तेच महत्वाचं आहे.

News Title : Loksabha Election 2024 Plan 475 check details on 29 May 2023.

हॅशटॅग्स

#Loksabha Election 2024(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x