23 November 2024 1:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

RVNL Share Price | सरकारी आरव्हीएनएल शेअरने एका वर्षात 275 टक्के परतावा दिला, पुन्हा स्टॉक तेजीचे नेमके कारण काय?

Highlights:

  • RVNL Share Price
  • शेअर्स बुलेट ट्रेनच्या तेजीत
  • तिमाही निकाल तपशील
  • LIC ची गुंतवणूक
RVNL Share Price

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL कंपनीने नुकताच आपले चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक निकालासोबत रेल विकास निगम कंपनीने शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 3.60 टक्के म्हणजेच 0.36 रुपये लाभांश वाटप करणार आहे.

शेअर्स बुलेट ट्रेनच्या तेजीत

तिमाही निकाल जाहीर करताच रेल्वे विकास निगम कंपनीचे शेअर्स बुलेट ट्रेनच्या तेजीत धावत आहेत. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग देखील पाहायला मिळाली आहे. मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 115.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

तिमाही निकाल तपशील

मार्च 2023 तिमाहीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात घट झाली आहे. कंपनीने सेबीला माहितीत म्हंटले आहे की, वार्षिक आधारावर कंपनीचा निव्वळ नफा कमी झाला आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने 359.30 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 378 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. याशिवाय जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान RVNL कंपनीने 5719.80 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2022 च्या तिमाहीच्या तुलनेत महसुलात 11 टक्के घट झाली आहे.

LIC ची गुंतवणूक

लेटेस्ट शेअर होल्डिंग डेटानुसार भारतातील सर्वात मोठी सरकारी इन्शुरन्स कंपनी LIC ने रेल विकास निगम कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. LIC कडे रेल विकास निगम कंपनीचे 13,29,43,000 शेअर्स आहेत. म्हणजेच LIC ने RVNL कंपनीचे 6.38 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. मागील एका वर्षात रेल विकास निगम शेअर्सच्या किमतीत 275 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 6 महिन्यांत RVNL कंपनीच्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून 64 टक्के नफा कमावला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price today on 30 May 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x