24 November 2024 5:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Rule Change from 1st June | अलर्ट! 1 जून पासून लागू झालेले हे बदल लक्षात ठेवा, सामान्य लोकांशी निगडित आहेत सर्व बदल

Highlights:

  • Rule Change from 1st June 
  • एलपीजी स्वस्त झाला
  • पॅन-आधार लिंकिंग
  • ईपीएफओ वाढीव पेन्शनची मुदत
  • टॅक्सच्या पहिला हप्ता
  • आर्थिक व्यवहारांचा तपशील देण्याची संधी
  • इलेक्ट्रिक दुचाकी महाग
  • बँकांमधील दावा न केलेल्या ठेवी
  • 12 दिवस बँका राहणार बंद
Rule Change from 1st June

Rule Change from 1st June | जून महिना सुरू झाला आहे. या महिन्यात फायनान्सशी संबंधित अनेक महत्त्वाच्या डेडलाईन आहेत. या डेडलाईनपर्यंत तुमचे काम पूर्ण करण्यात चुकल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर जूनच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींवर दिलासा मिळाला आहे. जाणून घेऊयात जून महिन्यात काय होणार आहे.

एलपीजी स्वस्त झाला

व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत ८३.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७७३ रुपये आहे. यापूर्वी दिल्लीत कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत 1856.50 रुपये होती. म्हणजे आजपासून व्यावसायिक सिलिंडर 83.50 रुपये स्वस्त झाले आहेत. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोदी सरकारने कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे वास्तविक सामान्य लोकांना त्याचा काहीच फायदा होणार नाही.

पॅन-आधार लिंकिंग

30 जूनपर्यंत पॅन आणि आधार लिंक करण्याची संधी आहे. ही डेडलाइन चुकल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. तर त्यानंतर लिंक केल्यास 10 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे.

ईपीएफओ वाढीव पेन्शनची मुदत

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) हायर पेन्शन योजनेसाठी २६ जूनपर्यंत अर्ज करण्याची संधी दिली आहे. ईपीएफओच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही उच्च पेन्शनसाठी अर्ज करू शकता.

टॅक्सच्या पहिला हप्ता

कर निर्धारण वर्ष 2024-25 साठी अग्रिम कराचा पहिला हप्ता 15 जून रोजी भरला जाईल. त्याचबरोबर कंपन्या करदात्यांसाठी फॉर्म 16 देखील पाठवणार आहेत.

आर्थिक व्यवहारांचा तपशील देण्याची संधी

बँका, परकीय चलन विक्रेते आणि इतर रिपोर्टिंग संस्थांना 2022-23 साठी त्यांच्या ग्राहकांना उच्च मूल्याच्या व्यवहारांची माहिती देण्यासाठी एसएफटी रिटर्न दाखल करण्यासाठी आणखी काही दिवस आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 साठी आर्थिक व्यवहारतपशील (एसएफटी) भरण्याची शेवटची तारीख 31 मे होती. एसएफटी रिटर्न भरण्यास उशीर केल्यास दररोज एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.

इलेक्ट्रिक दुचाकी महाग

आता तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. अवजड उद्योग मंत्रालयाने फेम-२ अनुदानाची रक्कम कमी केली आहे. आता तो १० हजार रुपये प्रति किलोवॅट झाला आहे. अशा तऱ्हेने बहुतांश इलेक्ट्रिक वाहने २५ ते ३५ हजार रुपयांपर्यंत महाग होऊ शकतात.

बँकांमधील दावा न केलेल्या ठेवी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) बँकांमधील दावा न केलेल्या ठेवींवर मोहीम राबवणार आहे. ‘१०० दिवस १०० देयके’ असे या मोहिमेचे नाव आहे. नुकतेच रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात बँकांना सूचना दिल्या होत्या.

12 दिवस बँका राहणार बंद

जूनमध्ये देशातील विविध राज्यांमध्ये 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. या दिवसांमध्ये बँकांच्या शाखांमध्ये जारी करण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. मात्र 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची संधी देण्यात आली आहे.

News Title : Rule Change from 1st June check details on 01 June 2023.

हॅशटॅग्स

#Rule Change from 1st June(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x