23 November 2024 1:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Authum Investment Share Price | 2.50 रुपयाच्या शेअरने 5 वर्षांत गुंतवणुकीवर 11340% परतावा दिला, आजही शेअर खरेदीला फेव्हरेट

Highlights:

  • Authum Investment Share Price 
  • ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर शेअरची आजची किंमत
  • गुंतवणुकीवर 11,340 टक्के परतावा
  • ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनी स्टॉकची कामगिरी
Authum Investment Share Price

Authum Investment Share Price | ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने अवघ्या काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. मागील 5 वर्षांत ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना अल्प गुंतवणुकीवर करोडो रुपये परतावा कमावून दिला आहे. ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4,857 कोटी रुपहे आहे. ही कंपनी मुख्यतः NBFC क्षेत्रात व्यवसाय करते.

ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर शेअरची आजची किंमत

मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 2.50 रुपयेवरून वाढून 286 रुपयेवर गेली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी तब्बल 11,340 टक्के नफा कमावला आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.40 टक्के घसरणीसह 282.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुंतवणुकीवर 11,340 टक्के परतावा

1 जून 2018 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 2.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 11.340 टक्के परतावा कमावून दिला आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 11,340 टक्के वाढून 1.13 कोटी रुपये झाले असते.

ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनी स्टॉकची कामगिरी

ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 27.08 टक्के परतावा कमावून दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून शेअरची किंमत 29.50 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या शेअरने लोकांना 75.65 टक्के नफा मिळवून दिला आहे.

मार्च 2023 तिमाहीमध्ये ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने एकत्रित निव्वळ नफ्यात 6.55 टक्के घट नोंदवली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 2073.53 कोटी रुपये होता. जो या तिमाहीत 1937.70 कोटी रुपयेवर आला आहे.

तथापि मार्च 2023 तिमाहीत कंपनीचा महसूल उणे 80.97 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 123.69 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2023 तिमाहीत ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा ऑपरेटिंग नफा 8.10 टक्के घसरणीसह 1917.64 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा ऑपरेटींग नफा 2086.64 कोटी रुपये होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Authum Investment & Infrastructure Share Price today on 01 June 2023.

हॅशटॅग्स

Authum Investment Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x