10 वर्षात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची एक वीटही भाजपने रचली नाही, आता ठाकरे सरकारच्या काळातील विकास कामांचं 'नामकरण' सुरु
Highlights:
- CM Eknath Shinde
- बिग बजेट मुंबई महानगपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत
- शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून शिंदेंचं संपूर्ण वर्ष कोर्ट कचेऱ्या, सभा आणि राजकीय फोडाफोडीत
- तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी २०२० पासून लक्ष घातलेला कोस्टल रोड
CM Eknath Shinde | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच प्रतापगड प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आणि शिवसृष्टीसाठी 350 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनराजे भोसले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत यांच्यासह शेकडो मंत्री आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी ऑनलाईन संवाद साधत शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पारंपारिक पद्धतीने पूजाविधी करण्यात आला. भगवे झेंडे, पताक्यांनी संपूर्ण रायगड परिसर सजून गेला होता. त्यामुळे हा संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.
बिग बजेट मुंबई महानगपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत
दरम्यान, एकाबाजूला कर्नाटकात दारुण पराभव झाला असून दुसऱ्याबाजूला भाजपचा डोळा असलेल्या बिग बजेट मुंबई महानगपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मात्र २०१४ मध्ये मुंबईच्या समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाल पुतळा उभा करण्याचं आश्वासन मोदी-शहांनी दिलं होतं. त्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदींनी दोन वेळा इव्हेन्ट सुद्धा केले होते. मात्र आज १० वर्ष उलटली तरी साधी एक वीटही रचता आलेली नाही. पंतप्रधान मोदींचं २०१६ मधील ट्विट पहा.
I am honoured to be getting the opportunity to perform the Bhoomipujan of #ShivSmarak.
— Narendra Modi (@narendramodi) December 24, 2016
शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून शिंदेंचं संपूर्ण वर्ष कोर्ट कचेऱ्या, सभा आणि राजकीय फोडाफोडीत
तसेच शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून शिंदेंचं संपूर्ण वर्ष कोर्ट कचेऱ्या, सभा आणि राजकीय फोडाफोडीत व्यर्थ गेलं आहे, ज्याचा सामान्य लोकांशी काहीही संबंध नव्हता. अशावेळी विकास करतील कसा? म्हणून महाविकास आघाडीच्या कार्यकाळातील विकास कामांचं ‘नामकरण’ करून क्रेडिट घेण्याचा केविलवाणा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय.
तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी २०२० पासून लक्ष घातलेला कोस्टल रोड
त्यामुळे आता मुंबईकर प्रश्न विचारातील म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्वतः तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी २०२० पासून लक्ष घातलेल्या कोस्टल रोडसारख्या ड्रीम प्रोजेक्टला नामकरणातून स्वतःच काम असल्याचा कांगावा करण्याची योजना आखल्याचे म्हटलं जातंय. शिवसेनेत फूट पडल्यापासून शिंदेंचं वर्ष कोर्ट कचेऱ्या, सभा-सोहळे यातच व्यस्त राहिल्याचं पाहायला मिळालंय. मग अशात विकास कामं होणार कुठून आणि त्यासाठीच महापुरुषांच्या नावाने पुन्हा इतरांच्या कामाचं क्रेडिट घेण्यास सुरुवात झाल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. कारण, २०२० पासून जेव्हा हा प्रकल्प उभा राहत होता, तेव्हा एकनाथ शिंदे हे शिवसेना फोडण्याची योजना आखण्यात व्यस्त होते जे सध्याच्या घडामोडीतून स्पष्ट होतंय. मात्र यातील वास्तव काय आहे ते समजून घेऊया…
Maharashtra CM Uddhav Thackeray launches Coastal Road Tunnel Boring Machine at Priyadarshini Park in Mumbai.
State Minister Aditya Thackeray is also present. pic.twitter.com/bA0n5mQwuA
— ANI (@ANI) January 11, 2021
मुंबई शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकरांना वाहतूक कोडींचा प्रचंड मोठा सामना करावा लागतो. उपनगरातून दक्षिण मुंबईपर्यंत जाण्यासाठी ३-४ तास अडकून राहावं लागतं. या वाहतूक कोडींतून मुंबईकरांची सुटका व्हावी मुंबई महापालिका कोस्टल रोडसारखा ड्रीम प्रोजेक्ट तयार करत आहे. या कोस्टल रोडचं काम प्रगतीपथावर असून पुढील २ वर्षात हा रस्ता सुरु होईल असा विश्वास तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त (8 डिसेंबर 2021) केला होता.
मुंबई कोस्टल रोड हा आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि त्यामुळे ते स्वतः या कामाच्या ठिकाणी वेळोवेळी लक्ष ठेवून आढावा घेत असे आणि त्यासंदर्भात समाज माध्यमांवर माहिती देतं असत. याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले (8 डिसेंबर 2021 रोजी) होते की, डिसेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड पूर्ण होईल. मेट्रो पूर्ण होईल, वरळी-शिवडी कनेक्शन दिसेल. मुंबईत येणारे शहरातील वाहतूक कोंडीला घाबरतात. मात्र ही कनेक्टिविटी सुरु झाली तर मुंबईत काम करण्यासाठी घाबरणारे लोक पुन्हा मुंबईत परततील असं त्यांनी सांगितले होते. त्यामुळे डिसेंबर २०२३ पासून मुंबईकरांची वाहतूक कोडींतून सुटका होण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टमधील महापालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाचे काम 2021 पासून वेगाने सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ७० टक्क्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे, तर मलबार हिल येथे समुद्राखालून जाणाऱ्या देशातील पहिल्या महाबोगद्याचे एक किलोमीटरपर्यंतचे काम जानेवारी 2022 मध्येच पूर्ण झाले होते. उर्वरित ९०० मीटरपर्यंतचे काम सुरू होते. स्वतः मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत 10 जानेवारी 2022 रोजी माहिती दिली होती.
प्रियदर्शनी पार्क पासून मरिन ड्राइव्हच्या दिशेने कोस्टल रोडच्या पहिल्या बोगद्याचे खोदकाम आज पूर्ण झाले.
Excavation of the 1st Tunnel from Priyadarshani Park to Marine Drive of the Mumbai Coastal Road is completed today!
Work began on 11th January 2021
Watch the historic moment pic.twitter.com/vt4AwzA0ZB
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 10, 2022
बोगदे खोदण्यासाठी चीनमधून महाकाय टनेल बोअरिंग मशीन
प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतचा १०.५८ किलोमीटरचा कोस्टल रोड मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येत आहे. या मार्गात चार अधिक चार लेनसह भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चीनमधून २,३०० टन वजनाचे महाकाय टनेल बोअरिंग मशीन २०२० मध्ये (उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना) मुंबईत आणण्यात आले होते. मलबार हिलच्या खालून हे बोगदे जाणार आहेत. या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या महाबोगद्याचे खोदकाम ११ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यात आले. टनेल बोरिंग मशीन या संयंत्राद्वारे हे काम सुरू होतं. त्यानुसार जमिनीच्या खाली १० ते ७० मीटर हे बोगदे असणार आहेत. प्रत्येक बोगद्याची लांबी २.०७ किलोमीटर असेल. यासाठी दररोज तीन सत्रांमध्ये काम सुरू होतं. मात्र शिंदेंनी शिवसेनेत फूट पाडली आणि हे काम रेंगाळले होते. शिंदे सरकारचं संपूर्ण वर्ष हे न्यायालयीन लढे, सभा आणि मिरवणुका यातच व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र आता निवडणुका तोंडावर आल्यावर एखादा राजकीय इव्हेन्ट करता येतोय का याची संधी शोधत असल्याचं म्हटलं जातंय.
News Title: State CM Eknath Shinde announced Mumbai coastal road will be named Chhatrapati Sambhaji Maharaj check details on 02 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News