23 November 2024 8:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Mankind Pharma Share Price | कंडोम बनवणाऱ्या मॅनकाइंड फार्मा शेअरने 5 दिवसात 11.80% परतावा दिला, पुढे शेअर मोठा फायदा देणार?

Highlights:

  • Mankind Pharma Share Price
  • मॅनकाइंड फार्मा शेअरची सध्याची किंमत
  • मॅनकाइंड कंपनीचा ब्रँडेड प्रिस्क्रिप्शन व्यवसाय 18 टक्क्यांनी मजबूत झाला
  • IPO स्टॉक 1,080 रुपये किमतीवर इश्यू करण्यात आला होता
Mankind Pharma Share Price

Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा या मॅनफोर्स कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या स्टॉकची लक्ष किंमत अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने 1,584 रुपयांवरून कमी करून 1,539 रुपये केली आहे. तथापि, कंपनीने या फार्मा स्टॉकवर आपले ‘बाय’ रेटिंग कायम ठेवले असून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये EPS मध्ये 30 पट वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.

मॅनकाइंड फार्मा शेअरची सध्याची किंमत

ब्रोकरेज फर्मने सांगितले की, मार्च 2023 तिमाहीत मॅनकाइंड फार्माचे एकूण मार्जिन 67.2 टक्के नोंदवले गेले होते. मुख्यत: कमी विक्रीमुळे कंपनीच्या मार्जिनमध्ये 40 बेसिस पॉइंट्सची घसरण पाहायला मिळाली होती. कंपनीचा EBITDA मार्जिन देखील 60 bps ने घसरुन 20.6 टक्क्यांवर आला होता. आज शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स 6.47 टक्के वाढीसह 1,485.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज फर्मने सांगितले की, मॅनकाइंड फार्मा कंपनीचा IPM 10-11 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. दोन वर्षांच्या कालावधीत कंपनीच्या कमाईमध्ये 13 टक्के CAGR दराने वाढ अपेक्षित आहे. मॅनकाइंड फार्मा कंपनीचा भारतातील व्यवसायातील IPM प्रमाण EBITDA पेक्षा जास्त आहे. FY25 पर्यंत मार्जिनमध्ये 25 टक्के सुधारणा होऊ शकते. ही सुधारणा मुख्यत्वे कमी इनपुट खर्च, Rx पोर्टफोलिओमध्ये मूल्यवर्धन, जुन्या उपचारांच्या योगदानाचे उत्तम मिश्रण यामुळे जलद वाढ होण्याची अपेक्षा आहे.

मॅनकाइंड कंपनीचा ब्रँडेड प्रिस्क्रिप्शन व्यवसाय 18 टक्क्यांनी मजबूत झाला

Antique फर्मने सांगितले की, Mankind India कंपनीच्या व्यवसायात वर्ष-दर-वर्ष काळाने 18 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. वर्ष-दर-वर्ष महसूल वाढ 19 टक्के होती. मॅनकाइंड कंपनीचा ब्रँडेड प्रिस्क्रिप्शन व्यवसाय 18 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. जो प्रामुख्याने अँटी-इन्फेक्टीव्ह रेस्पीरेटरी आणि GI द्वारे चालवला जात आहे. मॅनफोर्स आणि प्रीगा न्यूज या प्रमुख ब्रँड्सच्या ग्रामीण भागातील वाढत्या महणी कंपनीच्या ग्राहक आरोग्य सेवा व्यवसायात 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

IPO स्टॉक 1,080 रुपये किमतीवर इश्यू करण्यात आला होता

9 मे 2023 रोजी मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले होते. हा IPO स्टॉक 1,080 रुपये किमतीवर इश्यू करण्यात आला होता. आणि आता त्यात 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. तज्ञांनी या किंमत पातळीपासून आणखी 12 टक्क्यांची वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

मॅनकाइंड फार्मा कंपनी मार्च तिमाहीत 52 टक्क्यांच्या वाढीसह 294 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च तिमाहीत कंपनीचे ऑपरेशन्समधील महसूल 19 टक्क्यांच्या वाढीसह 2,053 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mankind Pharma Share Price today on 02 June 2023.

हॅशटॅग्स

#Mankind Pharma Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x