23 November 2024 8:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, 1 महिन्यात पैसे दुप्पट केले, शॉर्ट टर्म परतावा पाहा

Highlights:

  • Brightcom Group Share Price
  • दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांची स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक
  • ब्राइटकॉम ग्रुप शेअरने एका महिन्यात पैसे दुप्पट केले
  • शेअर्समध्ये 1 लाख रुपयाचे 2.04 लाख रुपये झाले
  • शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार
Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही काळापासून सतत अप्पर सर्किट लागत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 19.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे.

दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांची स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक

दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी देखील ब्राइटकॉम ग्रुप स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.35 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.85 टक्के वाढीसह 20.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्राइटकॉम ग्रुप शेअरने एका महिन्यात पैसे दुप्पट केले

2 मे 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 9.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.63 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शेअर्समध्ये 1 लाख रुपयाचे 2.04 लाख रुपये झाले

जर तुम्ही 2 मे 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2.04 लाख रुपये झाले असते. मागील 5 दिवसात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 20.88 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीच्या नवीन शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, शंकर शर्मा यांनी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे 2.5 कोटी शेअर्स म्हणजेच 1.24 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत. शंकर शर्मा यांच्या शेअरचे मूल्य 49 कोटी पेक्षा अधिक आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3961 कोटी रुपये आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price today on 02 June 2023.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x