22 November 2024 12:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Titan Company Share Price | रेखा झुनझुनवाला यांचा फेवरेट टायटन शेअर मजबूत वाढतोय, सामान्य गुंतवणूकदारही करोडपती झाले

Highlights:

  • Titan Company Share Price
  • झुनझुनवाला कुटुंबाने खूप मोठी गुंतवणूक केली
  • 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य 9.1 कोटी रुपये झाले
  • टायटनने जारी केलेले बोनस शेअर्स
  • टायटन शेअरचा परतावा पॅटर्न
Titan Company Share Price

Titan Company Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. टायटन कंपनीचे शेअर्स 3 रुपयांवरून वाढून 3000 रुपयेवर पोहचले आहेत..या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 91000 टक्के परतावा कमावून दिला आहे.

झुनझुनवाला कुटुंबाने खूप मोठी गुंतवणूक केली

टायटन कंपनीचे शेअर्स शुक्रवार 2 जून 2023 रोजी 2871.50 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. टायटन शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1827.15 रुपये.होती. टाटा समूहाच्या या कंपनीमध्ये झुनझुनवाला कुटुंबाने खूप मोठी गुंतवणूक केली आहे.

1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य 9.1 कोटी रुपये झाले

6 जून 2003 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 3.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2871.50 रुपये किमतीवर पोहोचले होते. टायटन कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत लोकांना 91227 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 6 जून 2003 रोजी टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 9.1 कोटी रुपये झाले असते.

टायटनने जारी केलेले बोनस शेअर्स

या गणनेमध्ये आपण टायटनने जारी केलेले बोनस शेअर्स विचारात घेतलेले नाहीत. जून 2011 मध्ये टायटन कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर वाटप केले होते. टायटन कंपनीच्या शेअर्सनी मागील 15 वर्षात लोकांना 4910 टक्के परतावा कमवून दिला आहे.

टायटन शेअरचा परतावा पॅटर्न

6 जून 2008 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 57.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 15 वर्षांपूर्वी टायटनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 50.33 लाख रुपये झाले असते. मागील एका वर्षात टायटन कंपनीच्या शेअरने लोकांना 29.65 टक्के परतावा कमावून दिला आहे.

जानेवारी-मार्च 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 46945970 शेअर्स आहेत. म्हणजेच त्यांनी कंपनीचे एकूण 5.29 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

रेखा झुनझुनवाला यांनी मार्च 2023 च्या तिमाहीत टायटन कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे डिसेंबर 2023 च्या तिमाहीत 45895970 शेअर्स होते. म्हणजेच त्यांच्याकडे 5.17 टक्के भाग भांडवल होते. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titan Company Share Price today on 03 June 2023.

हॅशटॅग्स

Titan Company Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x