22 November 2024 5:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Va Tech Wabag Share Price | वा टेक वाबाग कंपनीच्या शेअरमध्ये कमाईची संधी, रेखा झुनझुनवाला यांनी देखील शेअर खरेदी केला

Highlights:

  • Va Tech Wabag Share Price
  • वा टेक वाबाग शेअरची आजची किंमत
  • वा टेक वाबाग शेअरची टार्गेट प्राईस
  • वा टेक वाबाग शेअरची कामगिरी
  • मागील 1 वर्षात शेअरने 89.87 टक्के परतावा दिला
Va Tech Wabag Share Price

Va Tech Wabag Share Price | आज शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अनेक शेअर्स मजबूत तेजीत ट्रेड करत असून गुंतवणुकदार त्यातून फायदा मिळवत आहेत. असाच एक स्टॉक आहे, जो झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील आहे. ‘वा टेक वाबाग’ असे या शेअरचे नाव आहे.

वा टेक वाबाग शेअरची आजची किंमत

तज्ज्ञांच्या मते, वा टेक वाबाग कंपनीच्या शेअरचे मूलभूत तत्त्वे खूप मजबूत असून तज्ञांनी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी वा टेक वाबाग कंपनीचे शेअर्स 2.05 टक्के वाढीसह 475.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

वा टेक वाबाग शेअरची टार्गेट प्राईस

शेअर बाजारातील तज्ञांनी वा टेक वाबाग कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 460 ते 464 रुपये श्रेणीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. जर किंमत कमी झाली तर नुकसान होऊ शकतो, म्हणून तज्ञांनी 360 रुपयेवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. पुढील 3 वर्षांत हा स्टॉक किमान 1000 रुपये पर्यंत वाढू शकतो, असे तज्ञ म्हणाले. म्हणजेच गुंतवणूकदारांचे पैसे तब्बल अडीच पट वाढू शकतात.

वा टेक वाबग हा स्टॉक मध्यंतरी एकदम मंदीमध्ये आला होता. कारण कंपनीचे बहुतांश ऑर्डर रशियातून येतात. आणि याचा रशिया-युक्रेन युद्धामुळे कंपनीच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला होता. आता रशिया आणि युक्रेन युद्धातील कमी झालेल्या प्रभावामुळे हा शेअर पुन्हा तेजीसाठी सज्ज झाला आहे.

वा टेक वाबाग शेअरची कामगिरी

BSE NSE च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील या मल्टीबॅगर स्टॉकने एका महिन्यात 13.17 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 41.60 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

मागील 1 वर्षात शेअरने 89.87 टक्के परतावा दिला

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 89.87 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 466 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

वा टेक वाबाग या कंपनीचे शेअर्स झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओचा देखील भाग आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी वा टेक वाबाग कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

मार्च 2023 तिमाहीच्या आकडेवारीनुसार वा टेक वाबाग कंपनीमध्ये रेखा झुनझुनवाला यांनी 8 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. 2 जून रोजी त्याच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 232.7 कोटी रुपये होते.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Va Tech Wabag Share Price today on 05 June 2023.

हॅशटॅग्स

VA Tech Wabag Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x