22 November 2024 5:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Multibagger Stock | करोडपती शेअर! ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले, 3 रुपयाच्या शेअरने नशीब बदलले

Highlights:

  • Multibagger Stock
  • शेअरने 1 लाख रुपयांवर 5 कोटी परतावा दिला
  • शेअरमध्ये खरी तेजी 2014 नंतर पाहायला मिळाली
  • कंपनीचा व्यवसाय थोडक्यात
Multibagger Stock

Multibagger Stock | शेअर बाजार हा अद्भुत शेअर्सचा एक महासागर आहे. हे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत श्रीमंत बावण्याची क्षमता ठेवतात. सध्या जर तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमावू इच्छित असाल तर तुम्ही ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावू शकता.

शेअरने 1 लाख रुपयांवर 5 कोटी परतावा दिला

या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयांवर 5 कोटीं परतावा मिळवून दिला आहे. ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह कंपनीचे शेअर्स 1994 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. तेव्हा हा स्टॉक फक्त 3 रुपयेवर ट्रेड करत होता. आज मंगळवार दिनांक 6 जुन 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के घसरणीसह 1,394.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरमध्ये खरी तेजी 2014 नंतर पाहायला मिळाली

ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह कंपनीच्या शेअरमध्ये खरी तेजी 2014 नंतर पाहायला मिळाली. 5 सप्टेंबर 2014 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 2017 मध्ये हा स्टॉक 57 रुपये किमतीवर पोहोचला होता. 2020 नंतर ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह कंपनीचे शेअर्स रॉकेट बनले.

कोरोना लॉक डाऊनच्या काळात या कंपनीच्या शेअरने 100 रुपये किंमत स्पर्श केली होती. 2021 मध्ये स्टॉक 500 रुपयेच्या पार गेला. 5 जून 2023 रोजी ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह कंपनीचे शेअर्स 1400.45 रुपये किमतीवर पोहचले होते. 2014 पासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 28,000 टक्के परतावा कमावून दिला आहे.

जर तुम्ही 2014 मध्ये ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 कोटी रुपये झाले असते. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून शेअर धारक करोडपती झाले आहेत. जर तुम्ही 2014 मध्ये ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह स्टॉकमध्ये 2.74 रुपये दराने गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 36630 शेअर्स मिळाले असते. सध्या हा स्टॉक 1400 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 5 कोटी रुपये झाले असते.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात

ज्योती रेजिन्स ही कंपनी मुख्यतः केमिकल उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करते. ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह ही कंपनी लाकूड आणि पाईप्स चिकटवणारे केमिकल देखील बनवते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1681 कोटी रुपये आहे. त्याच वेळी, या स्टॉकचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1,818.45 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 700.33 रुपये होती.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock of Jyoti Resins and Adhesives share price today on 06 June 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x