22 November 2024 4:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

शरद पवार उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर; दुष्काळाने होरपळलेल्या जनतेशी संवाद साधणार

NCP, Sharad Pawar, Pankaja Munde, Loksabha Election 2019

परळी : एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे उद्या बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात ते संपूर्ण बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, दुष्काळी जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच गुरांच्या छावण्यांना भेट आणि जळालेल्या फळबागांची पहाणी देखील करणार असल्याचे वृत्त आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित राहणार आहेत.

पवार यांचे सकाळी १०.३० वाजता आष्टी तालुक्यातील खडकत येथे आगमन होणार आहे, तेथे ते शेतकर्‍यांशी थेट संवाद साधणार आहेत, त्यांच्या नेमक्या अडचणी समजून घेणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.४५ वाजता पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील एका गुराच्या छावणीस ते भेट देणार आहेत. दुपारी ०१.१५ वाजता ते नवगण राजुरी, जि.बीड येथील गुरांच्या छावणीस भेट देऊन त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. दुपारी ०३.३० वाजता ते पिंपळवंडी, ता.पाटोदा येथील गुरांच्या छावणीस भेट देणार आहेत, तसेच काही जळालेल्या फळबागांची पहाणी ही करणार असून, त्यानंतर मोटारीने बारामतीकडे रवाना होणार आहेत.

या दौर्‍यात त्यांच्या समवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब आजबे, युवक नेते संदिप क्षीरसागर, सतिश शिंदे, महेंद्र गर्जे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बीड जिल्ह्यात यावेळी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी शेतकर्‍यांचे जाणते नेते स्वतः शेतकर्‍यांच्या बांधावर जाणार आहेत.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x