23 November 2024 1:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Torrent Power share Price | मुंब्रा, शिळ, कळवा ते कल्याणमधील जनतेकडे दुर्लक्ष करून शिंदे-फडणवीस सरकारचा टोरंट कंपनीसोबत करार

Highlights:

  • Torrent Power share Price
  • आगरी समाज प्रतिष्ठानचे टोरेंट पॉवर कंपनी विरोधात आमरण उपोषण पुकारली होती
  • आगरी समाज प्रतिष्ठानने अनेक उपोषणं केली
  • टोरेंट पॉवरच्या शेअरमध्ये तेजी
  • टोरंट पॉवर वर्क ऑर्डर नेमकी काय आहे?
  • शेअर बाजारात काय परिस्थिती आहे
Torrent Power share Price

Torrent Power share Price | मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी १ नोव्हेंबर २०१९ रोजी आगरी समाज प्रतिष्ठानने टोरेंट पॉवर कंपनीविरोधात आयोजित केलेल्या भव्य मोर्चात सहभाग नोंदवला होता. त्यावेळी भव्य मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं होतं. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार राजू पाटील म्हणाले होते की, सदर कंपनीला माझा यापूर्वीच विरोध राहिलेला आहे आणि राज्यातील मंत्रिमंडळ अजून ठरलं नसल्याने प्रशासनाने तूर्तास या कंपनीच्या नव्या कार्यालयास स्थगिती द्यावी अशी विनंती देखील केली आहे. काही झालं तरी आम्ही टोरेंट पॉवर कंपनी येथून हटवणार म्हणजे हटवणार असा निश्चय यावेळी करण्यात आला होता.

आगरी समाज प्रतिष्ठानचे टोरेंट पॉवर कंपनी विरोधात आमरण उपोषण पुकारली होती

तत्पूर्वी, डोंबिवली जवळील आणि शीळरोडवरील देसाई गावात देखील आगरी समाज प्रतिष्ठानचे टोरेंट पॉवर कंपनी विरोधात आमरण उपोषण पुकारली होती, मात्र त्यावेळी स्थानिक राजकीय नेत्यांच्या हाकेला प्रशासनाने केराची टोपली दाखवली होती. टोरेंट पॉवर कंपनी हटाव अशी मागणी आगरी-कोळी संघटना तसेच इतर काही संघटनाने अनेक वेळा केली आहे.

आगरी समाज प्रतिष्ठानने अनेक उपोषणं केली

शीळरोड वरील विविध गावे, दिवा, मुंब्रा याभागात टोरेंट पॉवर या कंपनीला विजेच कंत्राट देण्यात आले आहेत आणि ती रद्द करावी यासाठी आगरी समाज प्रतिष्ठानने अनेक उपोषणं केली आहेत, मात्र त्याला यश आलेले नाही. सदर उपोषणला गावातील नागरिकांनी जाहीर पाठींबा दिला होता. मात्र सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यावेळी स्वतः आमदार राजू पाटील यांनी हा विषय सरकार दरबारी देखील उचलून धरणार असल्याचं म्हटलं होतं.

मात्र आता राज ठाकरे यांच्यासोबत शिंदे-फडणवीसांच्या गुप्त बैठका सुरु झाल्यानंतर आमदार राजू पाटील शांत झाले आहेत का प्रश्न कल्याण-डोंबिवलीतील लोकांना पडू शकतो. कारण शिंदे-फडणवीस सरकारने त्याच टोरंट पॉवर कंपनीसोबत मोठा करार करून दिवा, मुंब्रा, कळवा ते कल्याणमधीलमधील जनतेच्या आंदोलनांना केराची टोपली दाखवली आहे. तसेच मनसे या विषयात ‘सेट’ झाली का असा प्रश्न देखील समाज माध्यमांवर विचारला जातोय.

कारण त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असणारे अजित पवार यांची भेट घेणारे मनसेचे आमदार राजू पाटील सध्या विद्यमान उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आता भेट घेताना दिसत नाहीत. मात्र सध्या कोणत्यातरी कारणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सत्कार सोहळे आमदार राजू पाटील यांच्या कल्याण-डोंबिवलीतील कार्यालयात होताना दिसत आहेत. इथेच बराच काही सिद्ध होतंय, की शिवतीर्थावरून काय आदेश आला असावा त्याचा. कारण विषय २७,००० कोटीच्या एमओयू’चा आहे.

टोरेंट पॉवरच्या शेअरमध्ये तेजी

टोरेंट पॉवरच्या शेअरमध्ये आज ७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर आहेत. टोरंट पॉवरच्या शेअर्सच्या किमती वाढण्याचे प्रमुख कारण महाराष्ट्र सरकारसोबत चे हे सामंजस्य करार असल्याचे मानले जात आहे. सव्वा अकराच्या सुमारास कंपनीचा शेअर ७.१९ टक्क्यांच्या तेजीसह ६५५.६५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

टोरंट पॉवर वर्क ऑर्डर नेमकी काय आहे?

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत टोरेंट पॉवरने महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार कंपनी हायड्रो पॉवरची निर्मिती करणार आहे. त्याची किंमत २७ हजार कोटी रुपये आहे. हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होईल, अशी कंपनीची अपेक्षा आहे. यामुळे १३ हजार ५०० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे असं कंपनीने म्हटलं आहे.

शेअर बाजारात काय परिस्थिती आहे

टोरेंट पॉवर शेअर आज बीएसईवर ६३४.३५ रुपयांच्या पातळीवर उघडला. ज्यानंतर कंपनीचा शेअर उच्चांकी पातळीवर पोहोचला. गेल्या महिन्याभराबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या पोझिशनल गुंतवणूकदारांना २० टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. तर या वर्षी आतापर्यंत या शेअरमध्ये 31 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. टोरेंट पॉवरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ४३०.९० रुपये प्रति शेअर आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News : Torrent Power share Price Today check details on 07 June 2023.

हॅशटॅग्स

Torrent Power Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x