19 April 2025 5:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, सराफा बाजारात लगबग वाढली, नवे दर जाणून घ्या

Highlights:

  • Gold Price Today
  • महिन्याभरात सोन्यात दरात १७०० रुपयांची घसरण
  • एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात घसरण
  • सराफा बाजारातही सोन्या-चांदीत घसरण
  • तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर
Gold Price Today

Gold Price Today | गेल्या महिन्याच्या सुरुवातीला विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्या-चांदीमध्ये जूनच्या सुरुवातीला चढ-उतार होत आहेत. सोमवारी सोन्यात जोरदार घसरण झाल्यानंतर मंगळवारी बाजारात तेजी दिसून आली. पण ही तेजी थांबू शकली नाही आणि आज बुधवारी बाजारात तेजीचा सामना करावा लागत आहे. सोनं 60,000 रुपयांच्या खाली पोहोचलं आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला सोने 61739 रुपये आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोग्रॅम झाली होती. त्यानंतर सोनं चांदीच्या दरांमध्ये घसरण दिसून येत आहे.

महिन्याभरात सोन्यात दरात १७०० रुपयांची घसरण

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) बुधवारी दोन्ही धातूंच्या दरात घसरण दिसून आली. सराफा बाजारात हीच स्थिती कायम आहे. सोनं 60,000 रुपयांपर्यंत खाली आलं आहे. महिन्याभरात सोन्यात १७०० रुपयांहून अधिक ची घसरण झाली आहे. चांदी 71,000 रुपयांच्या पातळीवर कायम असून महिनाभरात त्यात 6000 रुपयांहून अधिकची घसरण पाहायला मिळत आहे. किंमती कमी झाल्या असल्या तरी दिवाळीच्या मुहूर्तावर सोने आणि चांदी दोन्हीमध्ये वाढ होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात घसरण

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवर बुधवारी सोने 180 रुपयांनी घसरून 59805 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 306 रुपयांनी घसरून 71650 रुपये प्रति किलो झाली. याआधी मंगळवारी एमसीएक्सवर सोने 59985 रुपये आणि चांदी 71956 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

आज सराफा बाजारातही सोन्या-चांदीत घसरण

सराफा बाजाराचे दर रोज दुपारी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातात. या वेबसाईटवर दिलेल्या दरा व्यतिरिक्त तुम्हाला खरेदीसाठी जीएसटी आणि मेकिंग चार्जेस भरावे लागतील. सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 139 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 59957 रुपयांवर पोहोचला आहे.

तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर

* औरंगाबाद, २२ कॅरेट सोने : ५५६०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०६५० रुपये
* भिवंडी, 22 कॅरेट सोने : 55630 रुपये, 24 कॅरेट सोने : 60680 रुपये
* कोल्हापूर, २२ कॅरेट सोने : ५५६०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०६५० रुपये
* लातूर, 22 कॅरेट सोने : 55630 रुपये, 24 कॅरेट सोने : 60680 रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 55600 रुपये, 24 कॅरेट सोने : 60650 रुपये
* नागपूर, २२ कॅरेट सोने : ५५६०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०६५० रुपये
* नाशिक, २२ कॅरेट सोने : ५५६३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०६८० रुपये
* पुणे, 22 कॅरेट सोने : 55600 रुपये, 24 कॅरेट सोने : 60650 रुपये
* सोलापूर, २२ कॅरेट सोने : ५५६०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०६५० रुपये
* वसई-विरार, २२ कॅरेट सोने : ५५६३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०६८० रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Price Today Updates check details on 07 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या