19 April 2025 2:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Force Motors Share Price | 1 महिन्यात दिला 65 टक्के परतावा दिला, फोर्स मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी वाढली, तेजीचा फायदा घेणार?

Highlights:

  • Force Motors Share Price
  • कंपनीची कामगिरी
  • तिमाही कामगिरी
  • 1 महिन्यात दिला 65 टक्के परतावा
Force Motors Share Price

Force Motors Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फोर्स मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये अचानक अद्भूत उसळी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स 2130 रुपये या आपल्या 52 आठवडयाच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. मात्र काही तासात स्टॉक 2226.10 रुपये या इंट्रा डे उच्चांक किमतीवर पोहचला होता.

दिवस भराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फोर्स मोटर्स कंपनीचे शेअर्स 4.14 टक्क्यांच्या वाढीसह 2202.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी फोर्स मोटर्स कंपनीचे शेअर्स 2,240.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीची कामगिरी

फोर्स मोटर्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात कंपनीच्या विक्रीमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. वार्षिक आधारावर या कंपनीच्या विक्रीमध्ये 30 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मे महिन्यात फोर्स मोटर्स कंपनीच्या निर्यातीत देखील दुप्पट वाढ झाली आहे. कंपनीच्या वार्षिक निर्यातीत 54.8 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

तिमाही कामगिरी

फोर्स मोटर्स कंपनीने नुकताच आपले Q4 चे निकाल जाहीर केले आहेत. मार्च 2023 तिमाहीत फोर्स मोटर्स लिमिटेड कंपनीने 146.62 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 42.77 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत फोर्स मोटर्स कंपनीला 15.57 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत फोर्स मोटर्स कंपनीने अप्रतिम कामगिरी केली होती.

1 महिन्यात दिला 65 टक्के परतावा

फोर्स मोटर्स कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाल्यापासून कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 65 टक्क्यांनी वाढले आहेत. जर तुम्ही 1 वर्षांपूर्वी फोर्स मोटर्स कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावले असते, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 111 टक्के वाढले असते. म्हणजेच एका वर्षभरात तुमचे पैसे दुप्पट झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News| Force Motors Share Price today on 08 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Force Motors Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या