27 November 2024 8:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

Income From Twitter | एलन मस्क यांची मोठी घोषणा, आता ट्विटर युजर्सना पैसे सुद्धा मिळणार, कमाईचा मार्ग

Income From Twitter

Income From Twitter | ट्विटर आता युजर्सना पैसे देणार आहे. जर आपण वेरिफाइड कॉन्टेंट क्रिएटर असाल तर तुमच्या कॉन्टेंटवरील प्रतिक्रियांवर दिसणाऱ्या जाहिरातींसाठी तुम्हाला पैसे मिळतील. कंपनीचे मालक एलन मस्क यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मस्क यांनी ट्विटमध्ये लिहिले की, एक्स/ट्विटर काही आठवड्यांत क्रिएटर्सना त्यांच्या रिप्लायमध्ये दाखवलेल्या जाहिरातींचे पैसे देण्यास सुरुवात करेल. मस्क पुढे म्हणाले की, क्रिएटरना पहिल्या ब्लॉकमध्ये एकूण 5 दशलक्ष डॉलर्स दिले जातील.

ट्विटरने काही आठवड्यांपूर्वी सब्सक्रिप्शन बेस्ड व्हेरिफिकेशन सुरू केले होते. मात्र, कंपनीने काही वेळातच दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या अकाऊंट्ससाठी फ्री ब्लू टिक परत आणली. आता कंपनी व्हेरिफाइड कंटेंट क्रिएटर्सच्या माध्यमातून आपल्या सब्सक्रिप्शन सेवेची जाहिरात करण्याच्या विचारात आहे. यामुळे कंपनीला जाहिरातदारांना परत आणण्यास मदत होईल.

तुम्ही एका तासापर्यंत ट्विट एडिट करू शकता
कंपनीने ट्विटर ब्लू युजर्ससाठी एक नवीन फीचर रोलआउट केले आहे. या फीचरच्या माध्यमातून ट्विटर ब्लू सबस्क्रायबर्स पोस्ट केल्यानंतर तासाभरापर्यंत आपले ट्विट एडिट करू शकतील.

ट्विट एडिट करण्याची सुविधा कंपनीने ऑक्टोबर २०२२ मध्ये सर्वप्रथम लाँच केली होती. त्यावेळी युजर्सला ट्विट एडिट करण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ मिळायचा. ट्विटर ब्लूसाठी भारतीय युजर्सना दरमहा 900 रुपये मोजावे लागतील. त्याचबरोबर वेबवर याचा वापर केल्यास तुम्हाला दरमहा 650 रुपये खर्च करावे लागतील.

Latest Marathi News : Income From Twitter to content creators says Elon Musk check details on 10 June 2023.

हॅशटॅग्स

#Income From Twitter(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x