सभांमध्ये 'धामिर्क दंगली' हे शहांचे आवडते विषय? मणिपूर दंगलीत हजारोंचा जीव जात असताना नांदडेमध्ये शिखांविरोधातील धामिर्क दंगलीचा आधार
Loksabha Election | केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे मुख्य रणनीतीकार अमित शहा यांनी शनिवारी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय रेषा आखली आणि पुढील सार्वत्रिक निवडणूक नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातच होणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले की, देशातील जनतेला देशाचा पुढचा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल.
अमित शहा यांनी नांदेड येथून निवडणूक प्रचाराची सुरुवात केली आणि आमचा पक्ष कोणत्याही किंमतीवर राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे रक्षण करेल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी जगात भारताचा सन्मान वाढवला आहे, तर राहुल गांधी परकीय भूमीवर देशाचा अपमान करण्यात व्यस्त आहेत. परदेशी परिषदांमध्ये जिथे एका देशाचा नेता नरेंद्र मोदींना ‘बॉस’ म्हणतो, तर दुसऱ्याला त्याचा ऑटोग्राफ हवा असतो. पण दुसरीकडे परकीय भूमीवर देशांतर्गत राजकारण न करण्याची जुनी परंपरा राहुल मोडीत काढत आहेत असं ते म्हणाले.
पुढे अमित शहा म्हणाले की, “पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि त्यानंतर सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग या नेहरू-गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनी भारतावर राज्य केले, पण कॉंग्रेस लोकांना शौचालये, घरे, वीज, मोफत रेशन, गॅस कनेक्शन देऊ शकली नाही. ते काय करत होते? स्वातंत्र्योत्तर भारतातील गरिबांची काळजी घेणारे नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट जाहीर करताना शहा यांनी उद्धव ठाकरे यांना ढोंगी म्हटले. 2019 च्या महाराष्ट्र निवडणुकीच्या पूर्वसंध्येला माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, त्यांनी भाजपला मोठा जनादेश मिळाल्यास फडणवीस मुख्यमंत्री होतील यावर सहमती दर्शवली. हे घडल्यावर त्यांनी माघार घेतली आणि मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी केली. राम मंदिर, समान नागरी कायदा आणि कर्नाटक सरकारने वीर सावरकरांना इतिहासाच्या पुस्तकातून वगळण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान शहा यांनी दिले.
अमित शहा यांनी राष्ट्रवादीकाँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ही टीका केली, पण त्यांना ‘सर्वात भ्रष्ट यूपीए सरकारचा भाग’ असे संबोधले. कलम ३७० हटवण्यास पवारांचा विरोध असल्याचा आरोप करत शहा म्हणाले, ‘कलम ३७० रद्द केल्यास खोऱ्यात रक्तपात होईल, असे राहुल आणि पवार म्हणत असत. दगड फेकण्याची हिंमतही आज कुणात नाही.
प्रचार सभांमध्ये ‘धामिर्क दंगली आणि जातं’ हे अमित शहांचे आवडते विषय?
शिखांच्या पवित्र स्थळी राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणत अमित शहा यांनी येथेही दुहेरी धार्मिक खेळी केली. ते म्हणाले, अमित शहांनी यावेळी गांधी घराण्याच्या बहाण्याने शीख दंगलीच्या जखमा खाजवून काँग्रेसविरोधात हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे राहुल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून संबोधून विरोधी आघाडीत फूट पडेल याची काळजी घेतली आहे, जेणेकरून विरोधकांची एकजूट युती म्हणून प्रत्यक्षात येऊ नये. महाराष्ट्रात पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
अनेकदा हेच पाहायला मिळालं आहे की अमित शहा त्यांच्या राजकीय प्रचार सभांमध्ये दंगली, हिंदू-मुस्लिम वाद अशा मुद्यांना अधिक हवा देतात. एकाबाजूला राज्यात कोल्हापूर आणि संभाजीनगरमध्ये अनुभव असताना आणि दुसरकडे मणिपूर मध्ये भाजपाची सत्ता असलेल्या राज्यात महिनाभर जातीय दंगलीतून शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोकं बेघर झाली आहेत. तसेच अजूनही ही दंगल शांत करण्यात अपयश आलेलं असताना केंद्रीय गृहमंत्री असलेले अमित शहा जुन्या धामिर्क दंगलींना उजाळा देतं आहेत. नांदेडमध्ये शीख समाजाची लोकं मोठ्या प्रमाणात राहतात आणि त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी अमित शहांनी पुन्हा शीखांविरोधातील त्या धामिर्क मुद्यांना हवा दिल्याचं पाहायला मिळालं. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत तर बोलायलाही नको. ते सुद्धा गृहमंत्री म्हणून जवाबदारी न पाहता केवळ ‘औरंग्या आणि विशिष्ट समाज-विशिष्ट समाज’ करत संवाद साधताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपचे हेतू काय आहेत ते देखील स्पष्ट होतं आहेत.
Latest News Title : Amit Shah Rally at Nanded check details on 11 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार